शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

घाणेगाव तलावाच्या ४५ टक्के जमिनीवर अतिक्रमण; परस्पर उभारले ४१ उद्योग

By बापू सोळुंके | Updated: March 12, 2025 19:45 IST

छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या घाणेगाव, परदेशवाडी, साजापूर, करोडी, तीसगाव, केसापुरी इ. गावांसाठी ५० वर्षांपूर्वी शासनाने विविध लघुसिंचन तलाव, गाव तलाव बांधले होते.

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसीपासून जवळच असलेल्या घाणेगाव येथील लघुसिंचन तलावासाठी ५० वर्षांपूर्वी संपादित जमिनी तेव्हाच सरकारच्या नावे करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आजही मूळ मालकाच्या वारसदारांच्या नावे असलेल्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनींची परस्पर खरेदी-विक्री होत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. यासोबतच जलसंपदा विभागाच्या मालकीच्या जमिनींवर तब्बल ४१ लघुउद्योग सुरू आहेत. ही बाब निदर्शनास येताच जलसंपदा विभागाने ४१ उद्योजकांना नोटिसा बजावल्या.

छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या घाणेगाव, परदेशवाडी, साजापूर, करोडी, तीसगाव, केसापुरी इ. गावांसाठी ५० वर्षांपूर्वी शासनाने विविध लघुसिंचन तलाव, गाव तलाव बांधले होते. या तलावांसाठी शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करून तेव्हाच त्यांना मोबदलाही दिला होता. मात्र तत्कालीन भूसंपादन अधिकाऱ्यांनी या जमिनीच्या सातबाऱ्यावरील मूळ जमीन मालकाचे नाव कमी करून जलसंपदा विभागाचे नाव लावण्याकडे दुर्लक्ष केले होते. चारीसाठीही शासनाकडून जमीन संपादित करण्यात येते. घाणेगाव येथील चारीवर अतिक्रमण झाल्याचे जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मनीष निरंजन यांच्या लक्षात आले. शिवाय तलावासाठी संपादित जमिनीवर ४२ लघुउद्योग दिसले.

शहरालगतच्या गावांतील जमिनींना सोन्याचा भाव आल्याने आपल्या जमिनी कुठे आहेत आणि त्या जमिनींच्या मालकी हक्काची काय अवस्था आहे, याची शोधमोहीम त्यांनी हाती घेतली. घाणेगाव तलावाच्या ४५ टक्के जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. विविध गटातील संपादित जमिनी मूळ मालकांच्या वारसदारांच्या नावे आहेत. वारसदारांनी परस्पर जमिनीची विक्री केली. हा मोठा घोटाळा असल्याने त्यांनी आणखी दोन अधिकाऱ्यांना कामाला लावले आणि तहसील कार्यालयातून भूसंपादनाची मूळ कागदपत्रे मिळविली. या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी सर्वप्रथम अतिक्रमित जमिनी शासनाच्या नावे करण्यास प्राधान्य दिले. घाणेगाव तलावासाठी गट नंबर ४६ मधील संपादित ८ एकर ३५ गुंठे जमिनीवर ४१ लघुउद्योग दिसले. हे अतिक्रमण काढण्यासाठी उद्योजकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

प्रक्रिया सुरू केली आहेशहरालगतच्या विविध गावांसाठी जलसंपदा विभागाने ५० वर्षांपूर्वी तलाव बांधले होते. या तलावांसाठी जमिनी संपादित केल्यानंतर संबंधित जमीन मालकांना पैसेही दिले होते. मात्र या जमिनी शासनाच्या नावे करण्यास तत्कालीन अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी, आज या जमिनी एकर तर संबंधित शेतकऱ्यांच्या वारसदारांच्या नावे आहेत किंवा त्यांनी विक्री केल्या आहेत. शिवाय या जमिनींवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले. ही अतिक्रमणे काढणे आणि संपादित जमिनी जलसंपदा विभागाच्या नावे करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली.- मनीष निरंजन, उपविभागीय अभियंता, जलसंपदा

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEnchroachmentअतिक्रमण