शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण, अग्निशमनचे ‘माणिक’ला अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 15:19 IST

गारखेड्यातील माणिक हॉस्पिटलमध्ये सोमवारी सकाळी आग लागली. ३६ पेक्षा अधिक रुग्णांचे दैैव बलवत्तर होते म्हणून प्राण वाचले, अन्यथा अनर्थ झाला असता. एवढ्या भयंकर घटनेनंतरही महापालिका कुंभकर्णी झोपेत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गारखेड्यातील माणिक हॉस्पिटलमध्ये सोमवारी सकाळी आग लागली. ३६ पेक्षा अधिक रुग्णांचे दैैव बलवत्तर होते म्हणून प्राण वाचले, अन्यथा अनर्थ झाला असता. एवढ्या भयंकर घटनेनंतरही महापालिका कुंभकर्णी झोपेत आहे. घटनेतील दोषींचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय तज्ज्ञ मंडळींची समितीही नेमण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही. आग प्रकरणात महापालिकेचे अतिक्रमण हटाव आणि अग्निशमन विभाग शंभर टक्के दोषी असल्याचे दिसून येत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांना अभय देण्यात येत आहे.औैरंगपु-यातील फटाका मार्केटला आग लागून १०० पेक्षा अधिक दुकाने खाक झाली. जुन्या शहरातील पेट्रोलपंपांना अनेकदा आग लागली. मोठ्या इमारतींना अधून मधून आग लागल्याच्या घटना घडतच असतात. त्यानंतरही महापालिकेने आजपर्यंत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.नागरिकांची सुरक्षा हे महापालिकेचे दायित्व आहे, याचाही विसर प्रशासनाला पडला आहे. सोमवारी सकाळी माणिक हॉस्पिटलला आग लागली. वेळीच सर्व रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. माणिक हॉस्पिटलने काही वर्षांपूर्वी रुग्णालय उभारणीसाठी मनपाकडून रीतसर परवानगी घेतली. बांधकाम परवानगीनुसारच काम करण्यात आले. भोगवटा प्रमाणपत्रही मिळविले. त्यानंतर इमारतीची पार्किंग गायब करण्यात आली. इमारतीमध्ये अनेक अंतर्गत फेरबदल नियमबाह्य करण्यात आले. यासंदर्भात महापालिकेकडे तक्रारही प्राप्त झाली. तक्रारीवरून अतिक्रमण हटाव पथक कारवाईसाठी सज्ज झाले. तत्कालीन अधिका-यांनी कारवाईला बगल दिली. मनपाने दोन वर्षांपूर्वीच रुग्णालयावर कारवाई केली असती तर आग लागलीच नसती.शहरातील रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा आहे किंवा नाही, हे तपासण्याचे काम अग्निशमन विभागाने करणे अपेक्षित आहे. रुग्णालयांमध्ये खाजगी एजन्सीकडून अग्निशमन यंत्रणा उभारण्यात येते. त्यांनी दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारावर मनपाचा अग्निशमन विभाग संबंधित इमारतमालकाला एनओसी देतो.जागेवर अग्निशमन यंत्रणा आहे किंवा नाही, हे तपासण्याची तसदीही अग्निशमन विभाग घेत नाही. मोठमोठ्या इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारून देणा-या एजन्सीही मनपा अधिकाºयांच्या नातेवाईकांच्याच आहेत. त्यामुळे आजपर्यंत सर्व ‘खेळ’सुरळीतपणे सुरू आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfireआगdoctorडॉक्टरMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद