शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

अतिक्रमणे रात्री काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:58 IST

शहरातील मुख्य रस्त्यांचा श्वास मोकळा करण्याची प्रक्रिया शनिवारपासून महापालिकेने सुरू केली. सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील मुख्य रस्त्यांचा श्वास मोकळा करण्याची प्रक्रिया शनिवारपासून महापालिकेने सुरू केली. सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत. एका वाहनावर ध्वनिक्षेपक लावून अतिक्रमण केलेल्या छोट्या-छोट्या व्यावसायिकांना अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन करण्यात येईल. यानंतरही अतिक्रमण न काढल्यास त्वरित कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. मुख्य रस्त्यांवरून दुचाकी, चारचाकी वाहने सहज ये-जा करू शकतील एवढा रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यात येणार आहे.शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अतिक्रमण हटाव पथकाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित हटविण्यात यावीत. एका वाहनावर ध्वनिक्षेपक लावून दररोज विविध रस्त्यांवर पथक फिरविण्यात यावे.नागरिकांना, वाहनधारकांना अजिबात त्रास होणार नाही, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर प्रशासकीय विभागाची यंत्रणा लगेच कामाला लागली. शनिवारी एका जीपवर युद्धपातळीवर ध्वनिक्षेपक बसविण्यात आला. सायंकाळी सहा वाजता प्रशासकीय अधिकारी सी. एम. अभंग, पदनिर्देशित अधिकारी प्रभाकर पाठक, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, गवळी आदी कर्मचाºयांचा ताफा महापौरांनी रवाना केला.या पथकाने पोलिसी बंदोबस्तात शहागंज चमनपासून स्तुत्य उपक्रमाला सुरुवात केली. महापालिकेचा ताफा पाहताच रस्त्यांवरील हातगाड्या, फेरीवाले सैरावैरा पळू लागले. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे शहरातील त्रस्त नागरिकांनाही हायसे वाटले. पथकाने शहागंज चमनचा श्वास चारही बाजंूनी मोकळा केल्यावर मोर्चा गांधी पुतळा सिटीचौककडे वळविला.सिटीचौक ते गुलमंडी आणि नंतर पैठणगेटपर्यंत अतिक्रमण केलेल्या हातगाडी, फेरीवाल्यांना उद्यापासून रस्त्यावर याल तर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. काही ठिकाणी रस्त्यांवरच खुर्च्या, हातगाड्या लावल्या होत्या. हे सर्व साहित्य महापालिकेच्या पथकाने जप्त केले. महापालिकेला हा उपक्रम राबविण्यासाठी एक रुपयाही खर्च आला नाही. फक्त उपलब्ध यंत्रणेला कामाला लावण्यात आले.व्यापाºयांसह नागरिकही आनंदीनोटाबंदी, जीएसटीने अगोदरच व्यापाºयांचे कंबरडे मोडले आहे. गुलमंडी, रंगारगल्ली, टिळकपथ, पैठणगेट येथे व्यापाºयांनी लाखो रुपये भाडे भरून दुकाने सुरू केली आहेत. या दुकानांसमोर २४ तास हातगाड्या, फेरीवाल्यांचा मुक्त संचार असतो.दुकानात येणाºया ग्राहकाला दुचाकी वाहनही उभे करण्यासाठी जागा नसते. त्यामुळे मनपाच्या कारवाईचे व्यापाºयांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. महापालिकेची सायंकाळी सुरू झालेली कारवाई पाहून दुचाकी वाहनधारकांनी मनपाच्या पथकाचे आभार मानले.