नांदेड : जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केली, मात्र शासनस्तरावर आंदोलनाची दखल घेण्यात येत नसल्याने कर्मचाऱ्यांत असंतोष खदखदत आहे.२९ आॅक्टोंबर २०११ रोजी पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागातील, अर्थ मंत्रालयातील प्रधान सचिवांची बैठक होऊनही पाटबंधारे विभागाने ४५ वर्ष वयाच्या सुटीचा शासन निर्णय अद्यापही निघाला नाही. यासंदभारत २४ ते २७ जून २०१४ पर्यंत आझाद मैदान, मुंबई येथे संघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. प्रधान सचिव, पाटबंधारे विभाग यांच्याशी चर्चा करण्यात आली, मात्र आजपर्यंत शासन आदेश न निघाल्यामुळे कर्मचाऱ्यांत असंतोष पसरला आहे. (प्रतिनिधी)
जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांना ‘बुरे दिन’
By admin | Updated: August 8, 2014 00:34 IST