हिंगोली : १९७७ मधील आणीबाणीत तुरूंगवास भोगणाऱ्या लोकशाही रक्षकांना सन्मान मिळण्याच्या मागणीसाठी २२ जुलै रोजी २५० जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. भारतात आणीबाणी विरोधात व्यापक आंदोलन झाले होते. त्यावेळी एकट्या कळमनुरी तालुक्यात २५८ लोकांनी स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड विठ्ठलराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून तुरूंगवास भोगला होता. या आंदोलकांनी लोकशाहीला जपण्याचे महान कार्य केले असल्याने ती स्वातंत्र्याची दुसरी लढाई जिंकली होती. म्हणून या लोकांच्या सन्मानासाठी त्यांना स्वातंत्र्य सैैनिकाचा दर्जा देवून मानधन सुरू करण्याच्या मागणीसाठी आणीबाणीविरोधी लोकशाही रक्षक संघर्ष समितीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यात लोकशाही रक्षकांना स्वा.सैनिकांप्रमाणे पेन्शन द्यावे तसेच हयात नसलेल्या रक्षकांच्या वारसांना किवा पाल्यांना शिक्षण व नोकरीत सवलती द्याव्यात, अशी मागणी केली आहे.निवेदनावर अध्यक्ष नामदेव इंगोले, सविच अंकुशराव बुधवंत, धोंडबाराव दिंडे, माजी आ. दगडुजी गलांडे, बाबूराव शिंदे, एकनाथ हुंबे, मारोती खांडेकर, कामाजी दुधाळकर, तुकाराम जाधव, अझरअली जामकर, मोतीराम कुरूडे, चंपतराव नाईक, रमेश देवरे, विठ्ठलराव तोडकर, परसराम सोनटक्के, गणेशराव नाईक, दिनाजी क्षीरसागर, गणपतअप्पा येळीकर, उत्तमराव पोले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्यांचे धरणे आंदोलन
By admin | Updated: July 23, 2014 00:20 IST