उदगीर / देवणी : देवणी तालुक्यात बुधवारी सकाळी व उदगीर तालुक्याच्या काही भागात सायंकाळी झालेल्या बेमोसमी पावसाने आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे़ गेल्या दोन दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी झाली होती़ त्यातच बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास देवणी तालुक्यातील बहुतांश भागात हलका पाऊस झाला़ तसेच वलांडी परिसरातही पाऊस झाला़ वलांडी महसूल मंडळात १७ मिमी तर बोरोळ महसूल मंडळात २ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ या पावसामुळे आंब्याचे वगळता शेतीचे अन्य कसलेही नुकसान आमच्या निदर्शनास अद्याप आले नसल्याचे तालुका कृषी अधिकारी तोंडारे यांनी सांगितले़ तर जिवीत व वित्तहानीही कुठे झाली नसल्याची माहिती तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी दिली़उदगीरला सायंकाळी पावसाने झोडपले़ सोसाट्याचा वारा, मेघगर्जनेसह अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ पाऊस झाला़ (वार्ताहर)
उदगीर, देवणीत आंब्याचे नुकसान
By admin | Updated: March 17, 2017 00:25 IST