शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

जिल्ह्यात स्वच्छतागृहांची लाजीरवाणी अवस्था

By admin | Updated: August 20, 2014 00:22 IST

भास्कर लांडे, हिंगोली गावागावात स्वच्छतेचे आवाहन करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था पाहण्यालयक नाही.

भास्कर लांडे, हिंगोलीगावागावात स्वच्छतेचे आवाहन करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था पाहण्यालयक नाही. हिंगोलीतील एकही विभाग किंवा कार्यालयही त्याला अपवाद नाही. विशेषत: जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांश स्वच्छतागृहांना कुलूप असताना उर्वरितांचा दुरूनच उग्र वास येत असल्यामुळे आतमध्ये जाण्याचा विषयच येत नाही. परिणामी, कामानिमित्त गावातून येणाऱ्या लोकांबरोबरच महिलांना कुचंबनेला सामोरे जावे लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाशेजारी स्वच्छतागृहातील चारही शौचालयास कुलूप पाहवयास मिळते. पाण्याअभावी लांबूनच मुतारीचा उग्र वास येत असल्यामुळे आत जाण्याची कोणी हिंमत करीत नाही. दुसरीकडे समाजकल्याण विभाग, निवडणूक निर्णय अधिकारी आणि महिला बालविकास विभागाशेजारी असलेल्या स्वच्छतागृह कायम कुलूपबंद असते. कित्येक महिन्यांपासून या त्यांचे कुलूप काढले नसल्याने आत जाण्याचा विषयच येत नाही. बाहेरूनच स्वच्छतागृहाची कळा दृष्टीस पडते. पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरखाली उकीरडा दिसून आल्याने स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेचा विषयच लांबचा आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेतील स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई केली जात नाही. खुद्द आरोग्य विभागाशेजारील स्वच्छतागृहाची दुरवस्था असताना इतर विभागाची कल्पनाच न केलेली बरी. स्वच्छतेचे धडे देणाऱ्या पंचायत विभागाचीही पंचाईत आहे. बसस्थानकातील स्वच्छतागृहे स्वच्छतेपासून कोसोमैैल दूर आहेत. महावितरण, सामान्य रुग्णालय, तहसील, पंचायत समिती, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, बाजार समितीतीत सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत.अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कक्षातच स्वच्छतागृहे असल्याने बाहेरील नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. बहुतांश स्वच्छतागृहांची सफाई वर्षभर केलेली नाही; परंतु वापर सुरू राहिल्याने दुरवस्था झाली. विशेष म्हणजे दुरुस्तीकडेही कायम दुर्लक्ष. पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडील स्वच्छतागृहे चकाचक राहतात. तिकडे अनेक सेवक राबतात. मग सामान्य जनतेसाठीची सार्वजनिक स्वच्छतागृहेच दुरवस्थेत का राहतात? हे कळायला मार्ग नाही.शासन एकीकडे स्वच्छतेसाठी ओरड करीत असताना दुसरीकडे शासकीय अधिकाऱ्यांनी स्वच्छतेकडे कानाडोळा केला. स्वत:पुरते बघून सार्वजनिक स्वच्छतागृहांना कुलूप ठोकायचे अन् खुल्या गृहाकडे वर्षभर पाहायचे नाही. परिणामी, प्रत्येक कार्यालयातील स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीने नाक बांधून जावे लागते. माणूस कोठेही आडोसा धरतो; पण महिलांना कुचंबनेला सामोरे जावे लागते. हिंगोली शहरासह पाचही तालुक्यातील शासकीय कार्यालयांत हीच अवस्था आहे. आरोग्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयदेखील अपवाद ठरले नाहीत. कोणत्याही अधिकाऱ्यांना स्वच्छतेविषयी सोयरसुतक राहिले नसल्याने स्वच्छतागृहांची लाजीरवाणी अवस्था झाली. तरीही जिल्हाभर डांगोरा पिटून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात प्रशासन आम्ही आघाडीवर असल्याचे सांगते.सेनगावात व्यवस्था असूनही उपयोग नाहीराजकुमार देशमुख, सेनगावदुर्गंधी मूक्तगाव करण्यासाठी शासन विविध योजना राबवित असताना स्वच्छतागृहांच्या बाबतीत सेनगाव तालुक्यातील ‘दिव्याखाली अंधार’ म्हणावे लागेल. येथील कार्यालयात स्वच्छतागृहे असूनही त्याचा उपयोग होताना दिसत नाही. तहसील कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, तालुका भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालय अशी चार महत्त्वाची कार्यालये असल्याने स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली होती; परंतु तहसील प्रशासनाने स्वच्छतागृहाची व्यवस्था उपयोगात न आणता स्वच्छतागृहाच्या कक्षात रद्दबातल दस्तावेज भरून ठेवले आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयात तहसीलदाराच्या कक्षातील त्यांच्यापुरते मर्यादित असणारे स्वच्छतागृह उपयोगात आहे. इतर अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना आणि कामकाजानिमित्त येणाऱ्या ग्रामस्थांना स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने इमारतीच्या मागे कोपरा शोधावा लागत असल्याची दयनिय अवस्था आहे. पं.स. कार्यालयाच्या इमारतीत सर्वमान्यासाठी असणाऱ्या स्वच्छतागृहाची साफसफाई केली नसल्याने त्याचा उपयोग होत नसल्याने तहसीलप्रमाणे पं.स.ची दुरवस्था आहे. ग्रामीण भागात हागणदारीमुक्त गाव, निर्मलग्राम यासह अन्य स्वच्छता अभियान राबविणारी पंचायत समिती मात्र दुर्गंधीच्या फेऱ्यात अडकली आहे. जबाबदार अधिकारी या महत्त्वाच्या सुविधेकडे लक्ष देत नसल्याने ही समस्या रेंगाळत पडली आहे. (वार्ताहर)वसमत शहरात ‘कहीं खुशी, कहीं गम’चंद्रकांत देवण, वसमतयेथील सर्वच शासकीय कार्यालयात स्वच्छतागृह उपलब्ध आहेत. यातील अनेक कार्यालयांत स्वच्छतागृहांची परिस्थिती बरी आहे. तर काही कार्यालयात स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे चित्र मंगळवारी पहावयास मिळाले. वसमत येथील तहसील कार्यालयाची इमारत नवी झालेली आहे. त्यामुळे सुसज्ज इमारतीसह स्वच्छतागृह व शौचालयांचीही सोय आहे. तालुक्यातील ग्रामस्थांचा दररोज राबता असल्यामुळे तहसीलमधील स्वच्छतागृहांमुळे ग्रामस्थांची सोय झालेली आहे. न.प.मध्ये प्रवेश करताना पायऱ्याजवळचे स्वच्छतागृह स्वच्छ व टापटीप दिसते; परंतु दुसऱ्या मजल्यावर असलेल्या या स्वच्छतागृहाचे आऊटलेट पाईप चक्क उघडेच आहेत. या उघड्या पाईमधून मल-मुत्र चक्क उघड्यावर पडून दुर्गंधीयुक्त वातावरण तयार होते व बाजारात आलेल्यांना त्रास सहन करावा लागतो. पालिका प्रशासनास मात्र या परिस्थितीची कल्पनाच नसल्याने कित्येक वर्षांपासून या उघड्या आऊटलेटवर उपाय आजवर झालेला नाही. पं.स.मध्ये नव्याने स्वच्छतागृह बांधण्यात आलेले असताना शौचालयाची सोय नाही. पं.स. आवारात महिलांसाठी असलेल्या शौचालयास नेहमी कुलूपच असते. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या महिलांची कुंचबना होते. (वार्ताहर)कळमनुरी शहरात साफसफाईचा अभावशेख इलियास, कळमनुरीशहरातील सर्वच कार्यालयातील शौचालयाची साफसफाई होत नसल्याने शौचालयात गेल्यास त्रास सहन करावा लागतो. अनेक कार्यालयात फक्त मुताऱ्याच बांधलेल्या आहेत. बोटावर मोजण्याइतक्या कार्यालयात शौचालयाची व्यवस्था आहे. येथील तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, दुय्यम निबंधक, उपकोषागार कार्यालय आदी कार्यालये चालतात. ही इमारत नवीन बांधण्यात आल्याने मुतारी व शौचालयाची व्यवस्था येथे आहे; परंतु या शौचालयाची नियमित साफसफाई होणे गरजेचे आहे. येथील पं.स. कार्यालयातील शौचालयात जाळे लागले असून नियमित साफसफाई होत नाही, मुतारीत गेल्यास दुर्गंधीयुक्त वातावरण असते. कित्येक दिवसांपासून साफसफाई झालेली नाही. पाण्याची व्यवस्थाही येथे नाही. महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था केलेली नाही. सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या शौचालयाची तीच गत आहे. नियमित साफसफाई होत नसल्याने शौचालयात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालय हे पं.स.च्या क्वॉर्टरमध्ये चालते.या क्वॉर्टरचेच शौचालयांचा वापर कर्मचारी करतात तर एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाला शौचालयाची कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याचे चित्र आहे. शहरातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या मुतारीचीही नियमितपणे साफसफाई होत नाही. नगर पालिका कार्यालयातील शौचालय सध्या तरी चांगल्या अवस्थेत आहे; परंतु याचीही नियमित साफसफाई गरजेची आहे. महावितरण कार्यालयात मुतारीची व्यवस्था नव्हती; परंतु येथील शौचालयाचे बांधकाम सध्या सुरू आहे.महावितरणच्या शहर शाखेला तर शौचालयाची व्यवस्था नाही. जवळपास सर्वच कार्यालयातील शौचालयाची नियमितपणे साफसफाई होत नसल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)