शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्रकल्पांत अकरा टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:46 IST

जालना : समाधानकारक पावसाअभावी जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये केवळ ११ टक्के उपयुक्त जलसाठा आहे,

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : समाधानकारक पावसाअभावी जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये केवळ ११ टक्के उपयुक्त जलसाठा आहे, तर ६४ पैकी ३८ प्रकल्प अद्याप जोत्याखाली असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात सात मध्यम तर ५७ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता २७३.२५ दलघमी आहे. या आठवड्यातील अहवालानुसार मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये केवळ २५.७१ दलघमी जलसाठा आहे. यातील उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी १०.८२ टक्के एवढा आहे. कल्याण गिरजा, कल्याण, अप्पर दुधना, जुई, धामणा, जीवरेखा, गल्हाटी या मध्यम प्रकल्पांमध्ये २४. ७३ टक्के जलसाठा आहे. वाकी, दरेगाव, जामवाडी, निरखेड तांडा, वानडगाव, पिंपळवाडी, कुंभेफळ, सोमठाणा, बरंजळा, प्रल्हादपूर, पिंपळगाव कोलते, चांदईएक्को,पळसखेडा, बानेगाव, चिंचखेडा, डोलखेडा, डावरगाव, कानडगाव, भातखेडा, सुखापुरी, धनगरपिंप्री, खडकेश्वर, टाक, लासुरा, पाणेगाव, तळेगाव, मुसा भद्रायणी दहेगाव, जांबसमर्थ इ. लघु प्रकल्प अद्याप जोत्याखाली आहेत. तर सारवाडी व नेर प्रकल्प पूर्णत: कोरडा आहे. मोठ्या सात प्रकल्पांपैकी तीन तर ५७ लघु प्रकल्पांमधील ५२ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उपलब्ध आहे. जालना जिल्ह्याची पावसाची एकूण सरासरी ६८८ मिलीमीटर असून, आतापर्यंत केवळ २१०. २७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्यामुळे बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. याचा पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला. मात्र, यंदा जिल्ह्यात अद्यापही सर्वदूर दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे विहिरींना अद्यापही पाणी आलेले नाही. पिकांची स्थिती नाजूक असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.