शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

वीज ग्राहकांकडे ८६६ कोटींची बाकी

By admin | Updated: July 10, 2017 00:05 IST

परभणी : परभणी जिल्ह्यामध्ये महावितरणचे २ लाख ८२ हजार वीज ग्राहक आहेत़ या ग्राहकांना १० उपविभागांतर्गत वीजपुरवठा केला जातो़ या ग्राहकांकडे महावितरणची ८६६ कोटी रुपयांची थकबाकी आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी जिल्ह्यामध्ये महावितरणचे २ लाख ८२ हजार वीज ग्राहक आहेत़ या ग्राहकांना १० उपविभागांतर्गत वीजपुरवठा केला जातो़ या ग्राहकांकडे महावितरणची ८६६ कोटी रुपयांची थकबाकी आहे़ त्यामुळे महावितरणला ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे़ विद्युत वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील २ लाख ८२ हजार ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी १० उपविभाग स्थापना केले आहेत़ यामध्ये परभणी शहर, पाथरी, पूर्णा, परभणी ग्रामीण, गंगाखेड, जिंतूर, मानवत, पालम, सेलू, सोनपेठ या उपविभागांतर्गत वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो़ तसेच ग्राहकांना विजेच्या संबंधी येणाऱ्या अडचणी या उपविभागांतर्गत सोडविल्या जातात़ विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज पुरवठा केलेल्या ग्राहकांना महिन्याकाठी बिल दिले जाते़ परंतु, गेल्या चार ते पाच वर्षांपासून महावितरणच्या काही वीज ग्राहकांनी त्यांना आलेल्या बिलाचा भरणा केला नाही़ त्यामुळे महावितरणच्या थकबाकीचा डोंगर वाढत गेला आहे़ यामध्ये १ लाख ७० हजार ९०० घरगुती वीज ग्राहक आहेत़ त्यांच्याकडे १५६ कोटींची थकबाकी आहे़ १२ हजार ४०५ व्यापारी आहेत, त्यांच्याकडे ९ कोटी ५९ लाख, ३ हजार ४८७ औद्योगिक ग्राहकांकडे साडेपाच कोटी, ९२ हजार कृषीपंपधारकांकडे ६०० कोटी, ७५२ नळयोजना पाणीपुरवठ्याकडे २० कोटी, १ हजार ५८३ पथदिव्यांची ७५ कोटींची थकबाकी आहे़, अशी एकूण महावितरणची ८६६ कोटी रुपयांची थकबाकी आहे़ वाढत्या थकबाकीमुळे महावितरणला जिल्ह्यातील वीज ग्राहकांना येणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यामुळे वीज ग्राहकांनी थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे़