शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वीजदर वाढीचा चटका! ३०० युनिटला दरमहा ८४७ तर वर्षभराच्या बिलात १०,१६४ रुपयांनी वाढ 

By साहेबराव हिवराळे | Updated: April 10, 2024 17:54 IST

पुढच्या वर्षीही वाढ होणार; इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दर अधिक..

छत्रपती संभाजीनगर : राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणने बिलात सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ लागू केली आहे, तर स्थिर आकारातही दहा टक्के दरवाढ केली आहे. ही वाढ एक एप्रिलपासून लागू झाली आहे.

समजा, तुमचा दर महिन्याचा वीज वापर शंभर युनिट आहे, तर सध्याच्या बिलात दरमहा ४९ रुपये, तर वर्षभराच्या बिलात ५८८ रुपयांनी वाढ होणार आहे. वापर ३०० युनिट असेल तर दरमहाच्या वीज बिलात ८४७ रुपयांनी तर वर्षभराच्या बिलात १० हजार १६४ रुपयांनी वाढ होणार आहे. तीनशे युनिट आणि त्यावरील विजेचा वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांच्या वीज बिलात मोठी वाढ होणार आहे.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दर अधिक..इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दर अधिक आहेत. वीज गळती रोखण्याकडे यंत्रणा लक्ष देत नाही तर दरवर्षी तोटा भरून काढण्यासाठी दर वाढवून घरगुती, व्यावसायिक ग्राहकांच्या खिशावर भुर्दंड टाकते. शहरात व्यावसायिक व सामान्य ग्राहकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार होय. इतर राज्यांना नियोजन जमते, आपल्याला का नाही? - अजित देशपांडे

भरावेच लागणार...महाराष्ट्र ऊर्जा नियामक आयोगाने गेल्या वर्षीच ही दरवाढ जाहीर केली होती. आता फक्त अंमलबजावणी केलेली आहे. पुढच्या वर्षीही वाढ होणार आहे.- प्रसाद कोकीळ, उद्योजक

एक एप्रिलपूर्वी दरमहा बिल (रुपयांमध्ये)वापरलेले युनिट -१०० - ३०० - ५००-स्थिर आकार - ११६ - ११६ - ११६-वीज आकार - ४४१ - २३६९ -५०९१-वीज शुल्क (१६ टक्के) -१११.६४- ४७२.१६ -९६४.३२वीजवहन आकार (१.१७ रुपया प्रतियुनिट) ११७- ३५१- ५८५इंधन समायोजन आकार -२५- ११५- २३५एकूण वीजबिल -८१०.८४- ३४२३.१६- ६९९१.३२

गणित मांडताना प्रतियुनिट दर आणि वहन आकार एकत्र करून गृहित धरलेला दर-५.५८ - १०.८१- १४.७८

एक एप्रिलपासून दरमहा बिल (रुपयांत)स्थिर आकार- १२८ - १२८- १२८वीज आकार- ४७१- ३०८७- ७२७५बीज शुल्क (१६ टक्के)- ११८.५६- ५८८.९६ - १३१५.६८वीज वहन आकार (१.१७ रुपया प्रतियुनिट)- ११७- ३५१- ५८५इंधन समायोजन आकार- २५- ११५- २३५एकूण वीजबिल- ८५९.५६ (वाढ ४९ रुपये)- ४२६९.९६ (वाढ ८४७ रुपये)- ९५३८.६८ (वाढ २५४७.३६)गणित मांडताना प्रतियुनिट दर आणि वहन आकार एकत्र करून गृहीत धरलेला दर- ५.८८ - ११.४६ -१५.७२

हे माहीत का तुम्हाला?- सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ केल्याचे महावितरणने जाहीर केले आहे.-प्रत्यक्षात १०० युनिट वापर असलेल्या ग्राहकांना दर महिन्याला बिलात ६.१७ टक्क्यांनी वाढ होणार- ३०० युनिट विजेचा वापर असलेल्या ग्राहकांच्या वीजबिलात दरमहा २४.७४ टक्क्यांनी-५०० युनिट वीजवापर असलेल्या ग्राहकांच्या वीजबिलात दरमहा ३६.४४ टक्के वाढ होणार

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज