शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वसाहतीत शिपायांनीच केली वीजचोरी

By admin | Updated: June 18, 2017 00:11 IST

नांदेड : स्नेहनगर येथील शासकीय वसाहतीत वास्तव्यास असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन शिपायांनीच आकडे टाकून वीजचोरी केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : स्नेहनगर येथील शासकीय वसाहतीत वास्तव्यास असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन शिपायांनीच आकडे टाकून वीजचोरी केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला़ या दोन्ही कर्मचाऱ्यांविरुद्ध महावितरणच्या लातूर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे़ महावितरणच्या शहर विभागाअंतर्गत असलेल्या युनिट- ४ मध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक अभियंता प्राची राठोड पथकासह शनिवारी स्नेहनगर शासकीय वसाहतीत तपासणी करीत होत्या़ यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागात शिपाई पदावर असलेले सुधाकर रघुनाथ सोनावळे हे आकडा टाकून वीजचोरी करीत असल्याचे आढळले़ सोनावळे यांचा वीजपुरवठा ३८ हजारांच्या थकबाकीमुळे कायमस्वरुपी खंडित करण्यात आला होता़ त्यांनी २२०३ युनिट वीजचोरी केल्याचे सिद्ध झाले असून त्यांना त्याबदल्यात २८, २०० रुपयांचे बिल लावले आहे़ तसेच दिगंबर दत्ता हटकर हे वीजमीटर न घेता थेट आकडा टाकून वीज वापरत होते़ त्यांनी २५६ युनिटची वीजचोरी केल्यामुळे त्यांना ३,९४० रुपयांचे बिल दिले आहे़ दोघांवरही वीज कायद्याप्रमाणे महावितरणच्या लातूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे़ वीजग्राहकांनी अधिकृत वीजजोडणी घेऊन वीज वापर करावा, असे आवाहन मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांनी केले़