शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी उकाड्यात इलेक्शन फिव्हर

By admin | Updated: April 1, 2016 01:10 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात तीव्र दुष्काळ असताना जिल्ह्यातील चार संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३ एप्रिल रोजी होत असून

लातूर : लातूर जिल्ह्यात तीव्र दुष्काळ असताना जिल्ह्यातील चार संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३ एप्रिल रोजी होत असून या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. जिल्हा वकील मंडळाच्या निवडणुकीसाठीही ७ एप्रिल रोजी मतदान होत असून, विद्यमान अध्यक्षांसह विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ ब मध्ये पोटनिवडणूक होत असून, काँग्रेस वगळता सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार या निवडणुकीत गुंतले आहेत. जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीचाही प्रचार व्हॉटस् अ‍ॅपवर रंगला आहे.निलंगा : निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडीसाठी येत्या रविवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे पॅनल उभे करून शड्डू ठोकले आहेत. वाढत्या उन्हाबरोबर प्रचाराची राळही उडत आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांबरोबर कलगीतुरा रंगत आहे.निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या निवडीसाठी तब्बल ३५ वर्षांनी निवडणूक होत आहे. काँग्रेसचे अशोकराव पाटील निलंगेकर, भाजपाचे पॅनल प्रमुख आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगत आहे. काका-पुतण्यांतील आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणुकीत चांगलाच रंग भरला आहे. या दोन्ही पॅनलने आपले प्रत्येकी १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे लिंबन महाराज रेशमे यांनीही आपले पॅनल उभे केले आहे. रेशमे यांच्या पॅनलला व्यापारी मतदारसंघातून उमेदवार न मिळाल्याने त्यांचे १७ उमेदवार रिंगणात आहेत. प्रचारासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक असल्याने काका-पुतण्यांनी मतदारसंघातील ७० गावे पिंजून काढली आहेत. प्रत्येक मतदारांच्या भेटी घेऊन कॉर्नर सभा घेतल्या जात आहेत. निलंगेकर काका-पुतण्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या औराद कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपाने आपला झेंडा रोवला आहे. निलंगा बाजार समितीवरही भाजपाचा करिष्मा दाखविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. (वार्ताहर)या निवडणुकीसाठी ३ एप्रिल रोजी १२ केंद्रांवर मतदान होणार आहे. यात सोसायटी मतदारसंघात ७६०, ग्रामपंचायत संघात ६२०, व्यापारी १६१, हमाल-मापाडीमधून ४५ मतदार आहेत. जिल्हा परिषद शाळा कासारशिरसी, जि.प. शाळा बामणी, निटूर, निलंगा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मतदान होणार आहे. ४ एप्रिल रोजी निलंगा येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र देशमुख यांनी सांगितले.शिवसेनेच्या प्रचाराचा गाजावाजा दिसून येत नाही. मात्र मतदारांच्या भेटी-गाठी घेण्यावर भर आहे. आम्ही निवडून नाही आलो तर कोणाचा तरी पराभव करण्यास हातभार लावू, अशी मानसिकता शिवसेनेची मानसिकता आहे.लातूर : लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचा कालावधी १० एप्रिलला संपत असल्याने अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. विशेष म्हणजे इच्छुकांचा व्हॉटस् अ‍ॅपवर प्रचारही रंगला आहे. अध्यक्ष व सचिव पदासाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यांनी मोर्चेबांधणीही केली आहे. विद्यमान अध्यक्ष अशोक चिंचोले, सचिव विजयकुुमार स्वामी, शाम पटवारी, विकास गाढवे, महादेव कुंभार, काकासाहेब गुट्टे यांनी आपली उमेदवारी घोषित केली आहे.दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. विजयकुमार शिंदे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. अर्ज विक्री व स्वीकृती १ ते २ एप्रिल या कालावधीत सकाळी ११ ते ५ या वेळेत होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी ३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार असून, उमेदवारी अर्जांवरील आक्षेपांवर ३ एप्रिल रोजीच निर्णय होणार आहे. त्यानंतर उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ दिला जाईल आणि ७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.