शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

औषधोपचारांसह वृद्धांना हवी मायेची ऊब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 21:58 IST

आजारांवर औषधोपचारांसह ज्येष्ठांना कुटुंबियांनी पुरेसा वेळ दिला पाहिजे. त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधून मायेची ऊब दिली पाहिजे, असा सूर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.

औरंगाबाद : वाढत्या वयोमानानुसार शरीरातील विविध अवयवांत बदल होत जातो. त्यामुळे वार्धक्याबरोबर स्मृतिभ्रंश, नेत्रविकार, बहिरेपणा अशा अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा वेळी आजारांवर औषधोपचारांसह ज्येष्ठांना कुटुंबियांनी पुरेसा वेळ दिला पाहिजे. त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधून मायेची ऊब दिली पाहिजे, असा सूर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) वार्धक्यशास्त्र विभाग आणि मेडिकल रिसर्च सोसायटी यांच्या वतीने गुरुवारी (दि.४) ‘वार्धक्यशास्त्र व त्याची गरज’ या विषयावर एकदिवसीय कंटिन्युर्इंग मेडिकल एज्युकेशन (सीएमई) घेण्यात आले. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते ‘सीएमई’चे उद्घाटन झाले. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. राजन बिंदू, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, वार्धक्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर, नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर, डॉ. वर्षा रोटे, डॉ. शैलजा राव, डॉ. लईक मोहंमद, डॉ. वसंत पवार, डॉ. अंजली शेटे, डॉ. स्मिता अंदुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. मंगला बोरकर म्हणाल्या, डॉक्टरांपासून नातेवाईकांकडून वयोवृद्ध लोकांची शुश्रुषा केली जाते. अनेक जण शुश्रुषा करण्यासाठी नर्सचीही नेमणूक करतात. परंतु शुश्रुषा करताना अनेकदा वृद्धांचा अनादर केला जातो. परंतु त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांच्याशी सौजन्याने वागले पाहिजे. वेळेवर आवश्यक ती औषधी दिली पाहिजे. अनेक घरांमध्ये वृद्धांची शुश्रुषा करण्याची जबाबदारी ही फक्त महिलेवर टाकली जाते. परंतु घरातील प्रत्येक सदस्याने त्यासाठी मदत केली पाहिजे.डॉ. शैलजा राव यांनी वार्धक्यशास्त्र नेमके काय आहे, यावर प्रकाश टाकला. ६० वर्षांवरील व्यक्तींची औषधोपचारांसह विविध काळजी कशी घ्यावी, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. लईक यांनी वयोमानानुसार शरीररचनेत होणाऱ्या बदलाविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी डॉ. महेश पाटील, डॉ.आशिष राजन, डॉ. झेबा फिरदोस, डॉ. सुमित चव्हाण, डॉ. प्रदीप राऊत, डॉ. कुणाल शिसोदिया, डॉ. प्रतिमा कुलकर्णी, डॉ. आनंद वाकोरे, सुभीही निसार, पूजा जगताप, नागेश सुरडकर, किशोरी पात्रे, राजेश घोडके, अभिराज पाटील, मनबीर कौर, महेबूब बेग आदींनी प्रयत्न केले.

मधुमेह, हायपर टेन्शनने बहिरेपणाडॉ. वसंत पवार म्हणाले, वार्धक्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होते. अशा वेळी समोरची व्यक्ती अधिक मोठ्याने बोलते. परंतु त्याचा ज्येष्ठांना अधिकच त्रास होतो. बहिरेपणा टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार केला पाहिजे. मधुमेह, हायपर टेन्शन टाळावे अथवा नियंत्रणात ठेवले पाहिजे. अन्यथा त्यातूनही बहिरेपणा येऊ शकतो. 

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद