शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव!
2
टाईम मॅगझीनच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत एकही भारतीय नाही, ट्रम्प-युनूस यांचा समावेश; असं आहे कारण
3
"तुम्ही मुख्यमंत्री असताना झोपला होतात का?" 'त्या' मागणीवरून गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
4
"तिच्या अंगाची दुर्गंधी येते"; प्रतिस्पर्ध्याला वापरण्यास सांगितले डीओ; टेनिसमधला अजब प्रकार
5
बाबा रामदेव यांच्या पतंजलीची अदार पूनावाला यांच्या कंपनीसोबत मोठी डिल; नवीन क्षेत्रात उडी
6
हो, मलाही शिंदेंच्या शिवसेनेत सहभागासाठी ऑफर; खासदार राजाभाऊ वाजे यांचा गौप्यस्फोट
7
३ दिवस खोलीत सडत राहिली काजोलच्या आजीची डेडबॉडी, ८४व्या वर्षी झाला दुर्देवी अंत
8
Stock Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात, Nifty ६० अंकांनी घसरला; IT Stocks आपटले
9
"बंगाली हिंदू बेघर, छावण्यांमध्ये खिचडी खातायत...!"; प. बंगालमधील हिंसाचारावरून मिथुन यांचा ममतांवर प्रहार, म्हणाले...
10
कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार, श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णीचाही होणार सन्मान
11
IPL 2025: "पराभवास मीच जबाबदार, मी चुकीचा शॉट खेळलो"; अजिंक्य रहाणे पराभवानंतर निराश
12
४३ कोटींचं अपार्टमेंट, २६ लाखांचं गोल्फ किट... कोण आहेत अनमोल सिंग जग्गी? SEBI नं कंपनीवर केली कारवाई
13
"तेव्हा सेन्सॉर बोर्ड म्हणालं मोदींनी जातीव्यवस्था नष्ट केलीय", 'फुले' सिनेमाच्या वादावर अनुराग कश्यप स्पष्टच बोलला
14
ठाणे : बाल आश्रमात २ मुलींवर अत्याचार, २९ पीडित मुलांची केली सुटका; संचालकासह पाच जणांवर गुन्हा
15
आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी
16
बँकांनी १६ लाख कोटी रुपयांवर सोडले पाणी; मोठमोठी कर्जे बुडीत खात्यात, पहिल्या क्रमांकावर कोणती बँक?
17
विशेष लेख: राहुल गांधी म्हणतात, ‘वाट बघेन! मला घाई नाही!’
18
एसटीच्या सवलतींचा महाराष्ट्रातील १८१ कोटी प्रवाशांना लाभ, ६,४९५ कोटींची सवलत; महामंडळाची माहिती
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२५: प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, एखादी आनंददायी बातमी मिळेल
20
युद्ध फायद्याचे? सेन्सेक्स ७७ हजारांवर, परदेशी गुंतवणूकदारांकडून देशात पैसे गुंतवणे सुरू

"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 15:15 IST

आनंद दिघे यांच्या जीवनावरील मराठी चित्रपट आला आहे, या सिनेमाची सध्या चर्चा सुरू आहे.

आनंद दिघे यांच्या जीवनावरील मराठी चित्रपट आला आहे, या सिनेमाची सध्या चर्चा सुरू आहे. दोन दिवसापूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आनंद दिघे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. 'धर्मवीर आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता. हे ठाणे जिल्ह्याला माहीत आहे, असा गंभीर आरोप  शिरसाट यांनी केला होता. यावर आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप

माध्यमांसोबत बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, संजय शिरसाट यांनी केलेले विधान चुकीचे आहे, त्यांना काही काम धंदे नाहीत का? ते नेहमी ठाकरे परिवारावर बोलतात. त्यांना आतापर्यंत कोणी मोठं केले, तरीही ते असं बोलतात. आता शिरसाट यांचा पराभव केला पाहिजे, त्यांचा पराभव करणारा मीच आहे. दिघेंच्या शेवटच्या क्षणी जर शिरसाट तिथे असतील तर आम्हाला शंका येते की संजय शिरसाट यांनी हे कृत्य केले असेल, असा गौप्सस्फोटही चंद्रकांत खैरे यांनी केला. 

"आजचे मुख्यमंत्री हे शेवटच्या क्षणी आनंद दिघेंच्याजवळ होते. त्यांनी तसं चित्रपटातही दाखवले आहे. आता आम्हाला माहित नाही कुणी, काय केलं. तुम्ही त्यांनाही विचारलं पाहिते. आनंद दिघे यांची प्रतिमा चांगली आहे ती बदनाम करण्याच काम संजय शिरसाट करत आहेत, असा आरोपही खैरे यांनी केला. 

संजय शिरसाठ यांचा आरोप काय?

धर्मवीर आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता. हे ठाणे जिल्ह्याला माहीत आहे, असा गंभीर आरोप शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये दिघे उपचार घेत होते ते हॉस्पिटल कायम बंद का करण्यात आले, असा सवाल करत शिरसाट यांनी दिघेचा यांचा मृत्यू का झाला याची चौकशी करण्याची मागणी केली.

संजय शिरसाठ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिघे यांच्या मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. ठाण्यात प्रत्येक जण दिघे यांचा घातपात झाल्याचा आरोप करतात. दिघे यांना डिस्चार्ज दिला जाणार होता. मात्र डिस्चार्ज द्यायच्या आधीच त्यांचा मृत्यू कसा झाला असा सवाल शिरसाठ यांनी केला आहे.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे