छत्रपती संभाजीनगर : "शिंदे कसले वाघ? जेव्हा अडचण येते, तेव्हा ते गावाकडे पळून जातात," अशी जोरदार टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. त्यांच्या मंत्र्याचा निधी पळवला जातो
दानवे म्हणाले, लाडकी बहिण योजनेसाठी दरमहा सुमारे ३३५ ते ४१० कोटी रुपये सामाजिक न्याय आणि आदिवासी कल्याण खात्यांतून वळवले जात आहेत. हे दोन्ही विभाग संवेदनशील असून, या निधी वळवळ्यामुळे आदिवासी आणि मागासवर्गीय समाजावर अन्याय होत आहे. राज्य सरकारचे अर्थ खात्यावर नियंत्रण नाही. निधी कसा आणि कुठून वळवायचा, हे संबंधित खात्याच्या मंत्र्यांनाही कळत नाही. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या खात्याचाच निधी वळवला जात आहे. मग त्यांना विचारले जाते का?" असा सवालही त्यांनी केला.
सरकारवर फक्त घोषणा करते मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या संमतीशिवाय असा निधी वळवता येत नाही. त्यामुळे हे सर्व निर्णय वरच्या पातळीवरूनच घेतले जात असल्याचे स्पष्ट होते. संजय गांधी निराधार योजना अजूनही अनेक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. सरकार केवळ मोठमोठ्या घोषणा करते, प्रत्यक्षात काहीही घडत नाही, अशी टीका दानवे यांनी सरकारवर केली.
वाघाचे नख-दात काढले आहेतशिंदे यांच्या पक्षाच्या मंत्र्यांचाच निधी दुसऱ्या योजनेसाठी वळवला जातो आहे. तरीही ते गप्प आहेत. काही अडचण आली की गावाकडे पळतात. अशा वाघाचे नख आणि दात काढून टाकले आहेत, अशी टीका दानवे यांनी केली.