शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

चोरांच्या मृत्यूप्रकरणी आठ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:46 IST

४०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल : पोलिसांच्या कोम्बिंग आॅपरेशनविरुद्ध वैजापुरात मोर्चा

वैजापूर : तालुक्यातील चांडगाव -पानव येथे शुक्रवारी जमावाने संशयित चोरांच्या टोळीतील आठ जणांना बेदम मारहाण केल्याने दोघांचा मृत्यू झाला होता, तर ६ चोर जखमी झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी कोम्बिंग आॅपरेशन करुन चांडगाव, जरुळ, पानव भागातील जवळपास चारशे जणांवर खून, जीवे मारण्याचा प्रयत्न व दंगलीचा गुन्हा दाखल केला व आठ जणांना अटक केली.चोरांच्या दहशतीमुळे आधीच हैराण झालेल्या नागरिकांमध्ये पोलिसांच्या या भूमिकेने भिती निर्माण झाली आहे. दोघांच्या मृत्यू प्रकरणात निष्पाप लोकांना विनाकारण कायद्याच्या कचाट्यात अडकवू नका, अशी मागणी करत माजी आमदार आर.एम. वाणी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी शनिवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.याप्रसंगी वाणी यांच्यासह नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील बोरनारे, माजी जिल्हा परिषद सदस्य अभय पाटील चिकटगावकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नबी पटेल तिडीकर यांच्या शिष्टमंडळाने उपविभागिय अधिकारी डॉ. संदीपान सानप, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, सहायक पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांच्याशी चर्चा करुन निवेदन दिले.शनिवारी पानव, जरुळ, चांडगाव, भायगाव, रोटेगाव आदी भागातील शेकडो नागरिक वाणी यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर पुतळ्याजवळ जमा झाले व त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून निवेदन दिले. याप्रसंगी बाबासाहेब जगताप, चंद्रकांत कटारे, प्रकाश मतसागर, साईनाथ मतसागर, नंदकिशोर जाधव, धीरजसिंह राजपूत, मंजाहरी गाढे, मोहन साळुंके, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, एराज शेख, दिपकसिंग राजपूत, अ‍ॅड. प्रताप निंबाळकर, अ‍ॅड. नानासाहेब जगताप, दिगंबर मतसागर, दिनकर कुहिले, सागर गायकवाड, अरविंद शेवाळे, अमोल बावचे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.पोलिसांची कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशीवैजापूर पोलिसांनी शुक्रवारपासून चांडगाव व नांदगाव शिवारातील नागरिकांची धरपकड सुरू केल्याचे तीव्र पडसाद शनिवारी उमटले. पोलिसांची ही कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असल्याची टीका सर्वपक्षीय नेत्यांनी केली. ग्रामीण भागात नागरिक दहशतीखाली आहेत.निष्पाप लोकांवर कारवाई होणार नाही, असे उपविभागीय पोलीस अधिकारी लांजेवार यांनी सांगितले.शनिवारी अटक केलेल्या आठ जणांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेत मयत झालेल्या दोघांच्या कुटुंबियांनी मृतदेह नेण्यासाठी चोवीस तास उलटूनही पोलिसांशी संपर्क साधला नाही किंवा तक्रार केली नाही. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Morchaमोर्चाPoliceपोलिस