शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न; ‘पे अँड पार्क’, होर्डिंगसाठी जागा भाड्याने देणार

By विजय सरवदे | Updated: August 31, 2022 12:10 IST

मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे बघितले जाते; परंतु सर्वार्थाने जिल्हा परिषदेची आर्थिक बाजू दुबळी आहे.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाने ‘पे अँड पार्क’, जाहिरातींचे होर्डिंग लावण्यासाठी जागा भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे.

मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे बघितले जाते; परंतु सर्वार्थाने जिल्हा परिषदेची आर्थिक बाजू दुबळी आहे. विविध योजना राबविण्यासाठी शासनाकडून निधी येतो. मात्र, जि.प.चा गाडा हाकण्यासाठी मिळणारे उत्पन्न अतिशय तुटपुंजे आहे. उत्पन्न वाढावे म्हणून आता मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी कंबर कसली असून, जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील जागेवर शहरात येणाऱ्या वाहनांसाठी ‘पे अँड पार्क’ ही योजना सुरू करणे, जाहिरात होर्डिंगसाठी जि.प.च्या जागांचा उपयोग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. सध्या शहरात खरेदीसाठी, चित्रपट पाहण्यासाठी चारचाकी, दुचाकीवर येणारे अनेकजण जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील जागेवर आपली वाहने उभी करतात. या फुकट्यांना आवर घालावा आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करता यावेत, यासाठी ‘पे अँड पार्क’ची योजना आखण्यात आली आहे. याशिवाय जि. प. मुख्यालय हे शहराच्या मध्यवस्तीत असून, तेथील जागांचा जाहिरातींसाठी चांगला वापर होऊ शकतो, हे गृहीत धरून जाहिरात होर्डिंगसाठी जि.प.च्या जागांचा वापर होऊ शकतो. त्यातून प्रशासनाला चांगले उत्पन्नही मिळू शकते. यासाठी एक एजन्सी नेमण्यात येणार आहे. लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

९ वाहनांचा केला लिलावमुख्यालयात धूळ खात पडून असलेल्या जिल्हा परिषदेच्या १२ ते १५ वर्षे जुन्या ९ वाहनांचा नुकताच लिलाव करण्यात आला आहे. त्यातून ३ लाख ६८ हजार १०० रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, लिलावाद्वारे ५ लाख ७७ हजार २७६ रुपये मिळाले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेला २ लाखांचा फायदा झाला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेला नवीन ४ गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद