शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

शिक्षणाधिकार्‍यांनी नाकारला पदभार

By admin | Updated: May 8, 2014 23:12 IST

शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागावर आरोपाच्या फैरी डागल्यानंतर व्यथित झालेल्या शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांनी आता पदभार नाकारला आहे़

लातूर : लातूर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग नेहमीच कोणत्या न् कोणत्या चर्चेत असतोच़ पाच दिवसांपूर्वीच शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागावर आरोपाच्या फैरी डागल्यानंतर व्यथित झालेल्या शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांनी आता पदभार नाकारला आहे़ त्यांनी तसा रीतसर अर्ज प्रशासनाकडे पाठविला आहे़ यावर जिल्हा परिषदेने शिक्षण संचालकांना हा अर्ज पाठवून कोणाकडे पदभार द्यायचा, याविषयी गुरुवारी मार्गदर्शन मागविले आहे़ दरम्यान, लाच प्रकरणात अडकलेल्या शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ व अधीक्षक पेठे यांची बदली झाली असून, त्यांना बुधवारी जिल्हा परिषदेने कार्यमुक्त केले आहे़ राज्याला शिक्षण पॅटर्न देणार्‍या लातूरच्या शिक्षण विभागामागे काही वर्षांपासून शुक्लकाष्ठ लागले आहे़ एकापाठोपाठ उघडकीस आलेल्या वेगवेगळ्या प्रकरणांमुळे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाची प्रतिमा मलीन होत चालली आहे़ तत्तकालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळापर्यंत प्राथमिक शिक्षण विभागात सर्व काही आलबेल होते़ याच विभागाने बी़आऱ लगड शिक्षणाधिकारी असताना सर्व शिक्षणा अभियानात राज्याला दिशा देणारे कार्य केले़ सलग दोन वर्षे शिक्षण विभागाने सर्व शिक्षणा अभियानात दृष्ट लागण्याजोगी कामगिरी करीत राज्यात प्रथम तसेच द्वितीय क्रमांक पटकाविला होता़ त्यानंतर आलेल्या शिक्षणाधिकारी जोशी यांचा कार्यकाळही गुणवत्तेच्या बाबतीत चांगलाच राहिला़ परंतु, त्यांच्या कार्यकाळातील शेवटच्या टप्प्यात तुकडी वाटपातील अनियमितता समोर आली अन् येथूनच घर आणि घराचे वासे फिरले़ जोशी यांच्या बदलीनंतर उपशिक्षणाधिकारी वाघमारे, खुडे यांनी प्रभारी पदभार वाहून नेला़ दरम्यान, कैलास दातखीळ यांना शिक्षणाधिकारी म्हणून पहिलीच नियुक्ती लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात मिळाली़ मात्र सुरुवातीपासूनच ते चर्चेत राहिले़ काही महिन्यातच दातखीळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले़ त्यांच्यासह अधीक्षक पेठे हेही लाच प्रकरणात अडकले गेले़ यामुळे शिक्षण विभागाची प्रतिमा आणखीच मलीन झाली़ दरम्यानच्या काळात उपशिक्षणाधिकारी खुडे यांच्यावरही साधनव्यक्तींना दोन महिन्याचे मानधन विनाकरार अदा केल्याचा ठपका ठेवला गेला़ त्यात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले आहेत़ सर्वसाधारण सभेने त्यांच्यावर सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला होता़ अशा पद्धतीने अलिकडच्या काळात प्राथमिक शिक्षण विभाग नेहमीच चर्चेत राहिला आहे़ त्यातच आठवडाभरापूर्वी शिक्षक संघटनांनी विद्यमान शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग, उपशिक्षणाधिकारी खुडे, अधीक्षक प्रवीण गायकवाड यांच्यासह कर्मचार्‍यांवर आरोप करीत मोर्चाची तयारी केली होती़ या आरोपामुळे व्यथीत झालेले शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला पदमुक्त करण्याची लेखी विनंती केली आहे़ समजूत काढूनही ते हे पद पुढे चालविण्यास उत्सुक नाहीत़ त्यामुळे गुरुवारी जिल्हा परिषद प्रशासनाने तेलंग यांचा अर्ज शिक्षण संचालकांकडे पाठविला आहे़ शिवाय, कोणाकडे पदभार द्यावा, याविषयी मार्गदर्शनही मागविण्यात आले आहे़(प्रतिनिधी) शिक्षणाधिकारी ते प्राध्यापक़़़़ करीअरची सुरूवात शिक्षणाधिकारी म्हणून झालेल्या कैलास दातखीळ यांना लाच प्रकरण चांगलेच भोवले आहे़ या प्रकरणानंतर रजेवर गेलेल्या दातखीळ यांची बदली औरंगाबाद येथील अँग्लो इंडियन संस्थेत प्राध्यापक म्हणून करण्यात आली आहे़ दरम्यान, याच लाच प्रकरणात अडकलेले अधीक्षक पेठे यांचीही बदली झाली आहे़ त्यांना यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात अधीक्षक म्हणून कायम ठेवण्यात आले आहे़ या दोघांच्या बदलीचे आदेश मंगळवारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाले़ त्यानंतर बुधवारी त्यांना कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी दिली़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे शिक्षणाधिकारी दातखीळ व अधीक्षक पेठे यांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यासंदर्भात शिक्षण संचालक, सचिव तसेच जिल्हा परिषदेशी पत्रव्यवहार करण्यात आला होता, असे उपाधीक्षक एऩजी़ अंकुशकर यांनी सांगितले़ मात्र त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही न होता बदली करून अन्यत्र पदस्थापना देण्यात आली आहे़