शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
7
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
8
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
9
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
10
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
11
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
12
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
13
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
14
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
15
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
16
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
17
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
18
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
19
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
20
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
Daily Top 2Weekly Top 5

सफरचंद खा आणि डॉक्टरांकडे जा !

By admin | Updated: August 7, 2014 02:04 IST

अलीकडच्या काळामध्ये सफरचंद खाऊन दवाखान्यात अ‍ॅडमिट होण्याची वेळ येऊ शकते.

विकास राऊ त  औरंगाबादएक सफरचंद खा आणि रोगमुक्त राहा, असे बोलले जाते. मात्र, अलीकडच्या काळामध्ये सफरचंद खाऊन दवाखान्यात अ‍ॅडमिट होण्याची वेळ येऊ शकते. सफरचंद ताजेतवाने दिसण्यासाठी त्यावर लावण्यात येणारे वॅक्स (मेण) आरोग्यासाठी घातक असून, त्याचा सर्रास वापर होतो आहे. शहरात येणारी फळे, त्यांच्या साठ्यांकडे अन्न व औषधी प्रशासन पूर्णत: दुर्लक्ष करीत असल्यामुळे फळे पिकविण्याचा व ते रासायनिक प्रक्रियेने टिकवून ठेवण्याचा धंदा शहरात जोरात सुरू आहे. शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये सध्या बाहेरून आयात केली जाणारी सफरचंद उपलब्ध आहेत. १८० रुपये किलो भावाने सफरचंदांची विक्री होत आहेत. त्या सफरचंदांवर वेगळ्या प्रकारचे मेण चकाकी येण्यासाठी लावलेले असून ते मेण आरोग्याला हानिकारक असू शकते. कारण ते ज्वलनशील मेण आहे. ताजे फळ का दिसतेसफरचंद विकत घेताना ती छान लालसर, ताजी चमकदार अशी बघून घेतली जातात. झाडावरून काढून दुकानात ही सफरचंद बाजारपेठेत यायला बरेच दिवस लागतात. असे असतानाही सफरचंद ताजेतवाने कसे दिसतात. कारण विशिष्ट प्रकारचे मेण त्यावर लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चाकू किंवा ब्लेडच्या साह्याने सफरचंदांवर घासले तर ते मेण दिसून येते. सफरचंदांना नैसर्गिक मेण असते, जेव्हा सफरचंद झाडांवरून काढली जातात. तेव्हा त्यांच्यावर नैसर्गिक मेणांचं आवरण असते. फळातील बाष्प निघून ते शुष्क होऊ नये यासाठी निसर्गाने ती व्यवस्था केलेली आहे. झाडावरून काढलेल्या सफरचंदाला बाजारपेठेपर्यंत येण्यास वेळ लागतो. दरम्यानच्या काळात फळांवरील नैसर्गिक मेण निघून जाते. फळे ताजी दिसावीत यासाठी त्यांच्यावर पुन्हा मेण लावले जाते.खाद्यपदार्थांवरील मेणाचे प्रकारफळांवर किंवा चमक येण्यासाठी खाद्यपदार्थांवर लावण्यात येणाऱ्या मेणाचे दोन प्रकार आहेत. यामध्ये नैसर्गिक आणि पेट्रोलियम (कृत्रिम) असे दोन प्रकार आहेत. पेट्रोलियमचा आधार असलेले कृत्रिम मेण असते. नैसर्गिक मेण पामच्या झाडापासून, मधमाशांनी तयारी केलेले मेण असते.हानिकारक मेणाचा वापरपेट्रोलियम मेणामध्ये हायड्रो कार्बन असते. पेट्रोलियम मेण आरोग्याला हानिकारक असते. नैसर्गिक मेण कोमट पाण्याने धुतल्यावर फळांवरून ते निघून जाते. मात्र, पेट्रोलियम मेण निघत नाही. ते तसेच फळाला चिकटून राहते. फळे थंड पाण्याने धुतली तरी त्यावरील मेण तसेच राहते. व्यापाऱ्यांनी फळे ताजी दिसण्यासाठी कोणते मेण वापरले आहे. हे सांगणे अवघड आहे.एफडीएचा दावा असा... शहरात येणाऱ्या सफरचंदांवर नैसर्गिक मेण लावलेले असते, असा दावा अन्न व औषधी प्रशासनाचे सहायक आयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी केला. मनपाने हात वर केले मनपा सूत्रांनी सांगितले की, अन्न व औषधी प्रशासनाकडे फळांच्या पेढ्या तपासण्याची जबाबदारी २०११ पासून आहे. पालिका सध्या कुठलीही कारवाई करीत नाही. असा उघडकीस आला प्रकार सदर प्रतिनिधीने गजानन महाराज मंदिर परिसरात १ किलो सफरचंदांची खरेदी केली. त्या सफरचंदाला मेणबत्तीसारखा वास येत असल्यामुळे ब्लेड त्यावर घासले असता मेण निघू लागले. ते मेण चमचामध्ये गोळा करून जाळले असता ते जळाले. याचा अर्थ शहरात येणाऱ्या सफरचंदांवर पेट्रोलियम बेस मेण लावण्यात येत आहे.तर जठराच्या आजाराचा धोका...घाटीतील सर्जन तथा सहायक प्राध्यापिका डॉ. अनिता कंडी म्हणाल्या की, सफरचंदाला चकाकी यावी म्हणून केमिकल पेट्रोजेली लावण्यात येत असेल तर घातक आहे. जेली लावलेले सफरचंद नियमित सेवन केल्यास जठराच्या आतड्यास इजा पोहोचू शकते, तसेच त्याच्या दूरगामी परिणामाचा विचार केल्यास कॅन्सरसारखा आजार उद्भवू शकतो.