शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आधी कारची विक्री, नंतर नोंदविली कारचोरीची फिर्याद, नगरसेवक पुत्राचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:27 IST

कार एका जणाला विक्री केल्यानंतर ती चोरीला गेल्याची पोलिसांत फिर्याद नोंदवून विमा कंपनीकडून नुकसानभरपाई घेणाऱ्या नगरसेवकाचा पुंडलिकनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी चोरीची कार नंदुरबार येथून जप्त क रून आणली. तपासात हा प्रकार समोर आल्यानंतर तपास अधिकारी आता याबाबतचा अहवाल सोमवारी न्यायालयात सादर करणार आहेत. शिवाय विमा मंजूर करणाऱ्या कंपनीसह संबंधित बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोपनीय अहवाल पाठविणार आहे.

औरंगाबाद : कार एका जणाला विक्री केल्यानंतर ती चोरीला गेल्याची पोलिसांत फिर्याद नोंदवून विमा कंपनीकडून नुकसानभरपाई घेणाऱ्या नगरसेवकाचा पुंडलिकनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी चोरीची कार नंदुरबार येथून जप्त क रून आणली. तपासात हा प्रकार समोर आल्यानंतर तपास अधिकारी आता याबाबतचा अहवाल सोमवारी न्यायालयात सादर करणार आहेत. शिवाय विमा मंजूर करणाऱ्या कंपनीसह संबंधित बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोपनीय अहवाल पाठविणार आहे.याविषयी अधिक माहिती देताना पुंडलिकनगर ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले की, उस्मानपुरा पोलीस ठाण्यात दीपक मगन निकाळजे यांनी त्यांची कार (एमएच-२० ईवाय-०८०७) चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात कारचोरीचा गुन्हा नोंदविला होता. तेव्हापासून पोलीस अधिकारी या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. दरम्यान, फिर्यादी निकाळजे यांनीच त्यांची कार एका जणाला विक्री केली आणि कारच्या विम्याचे पैसे लाटण्यासाठी चोरीची तक्रार नोंदविल्याची माहिती खबºयाने पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांना दिली. त्यानंतर खाडे यांनी ७ मार्च रोजी एक आदेश काढून या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्याकडे सोपविला. सोनवणे यांनी केलेल्या तपासात दीपक निकाळजे यांनी त्यांची कार पारिजातनगर येथील रहिवासी जगदीश संतोष जव्हेरी यांना साडेचार लाखांत विक्री केल्याचे समोर आले. कार खरेदीनंतर जव्हेरी यांनी वैयक्तिक कारणावरून राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याआधी जव्हेरी यांनी ही कार हिरालाल सोनी (रा. नंदुरबार) यांना विक्री केल्याचे समजले. यानंतर सपोनि. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. रमेश सांगळे, विष्णू मुढे यांनी नंदुरबार येथून ही कार जप्त करून आणली.बँक अधिकाºयांसोबत मिलीभगतसूत्रांनी सांगितले की, कार खरेदीसाठी निकाळजे यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. यापैकी साडेसात लाख रुपये कर्ज कारवर होते. असे असताना बँकेने त्यांना नो ड्यूज प्रमाणपत्र दिले. त्याआधारे त्यांनी ती कार विक्र ी केली. शिवाय पोलिसांकडून कारचोरीचा एफआयआर मिळवून त्याआधारे त्यांनी विमा कंपनीकडून विम्याची रक्कमही मिळविल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी