शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
3
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
4
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
5
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
6
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
7
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
8
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
9
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
10
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
11
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
12
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
13
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
14
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
15
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
16
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
17
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
18
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
19
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
20
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना

ई-पीक पेराचे मोबाइल ॲप्लिकेशन सतत हँग; लाखो शेतकरी नोंदीपासून वंचित

By बापू सोळुंके | Updated: August 21, 2024 12:16 IST

खरीप हंगामातील सर्वच पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी

छत्रपती संभाजीनगर : नैसर्गिक आपत्तीत शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळविण्यासाठी ई-पीक पेराची ऑनलाइन नोंदणी बंधनकारक आहे. मात्र, यावर्षी मोबाइल ॲप्लिकेशन सतत हँग व्हायचे, यामुळे सुमारे सहा लाख खातेदार शेतकऱ्यांना ई-पीक पेराची नोंद करता आली नसल्याचे समोर आले आहे.

गतवर्षी अत्यल्प पाऊस पडला होता. यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी झाले. कापूस आणि साेयाबीनची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नव्हता. याविषयी ओरड झाल्यानंतर शासनाने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना दोन हेक्टरपर्यंत पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली. ज्या शेतकऱ्यांनी गतवर्षी ई-पीक पेरा ॲप्लिकेशनवर नोंदणी केली आहे, त्यांनाच हे अनुदान मिळेल. या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

१५ ऑगस्टपर्यंत होती मुदतयावर्षी खरीप हंगामातील पिकांची ई नोंद करण्यासाठी १ ते १५ ऑगस्ट हा कालावधी दिला होता. ई-पीक पाहणी ॲप्लिकेशन अत्यंत संथपणे चालणे, अनेकदा प्रयत्न करूनही यावर शेतातील उभ्या पिकाचे छायाचित्र अपलोड न होणे, अशा समस्यांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागला. शिवाय सर्वच शेतकऱ्यांकडे अँड्राॅईड मोबाईल नसल्याने त्यांना ई- पीक पाहणीची ऑनलाइन नोंदणी करता आली नाही. याबाबतच्या तक्रारी शेतकरी कृषी अधिकाऱ्यांकडे करीत आहेत. मात्र, ई-पीक पेरा ही बाब महसूल विभागाशी संबंधित असल्याचे उत्तर दिले जाते. मात्र, शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पेरा नोंदणी करणे आवश्यक असल्याचे अधिकारी सांगतात.

जिल्ह्यात ११.४० लाख शेतकऱ्यांचा पीक विमायावर्षी जिल्ह्यातील ११ लाख ४० हजार खातेदार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. १ रुपयात पीक विमा मिळाल्याने शेतकऱ्यांनी सीएससी सेंटरवर जाऊन पीक विमा घेतला. मात्र, पीक पेरा नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अँड्राॅईड मोबाईलसह शेतात जाऊन उभ्या पिकाचे छायाचित्र अपलोड करावे लागते. त्यावर अक्षांश, रेखांश स्पष्टपणे दिसणे आवश्यक असते. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे अँड्राॅईड मोबाइल नाही, त्यांना ही नोंदणी करता आली नाही. केवळ ५ लाख शेतकऱ्यांनीच ई-पीक पाहणी नोंदणी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMobileमोबाइल