शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या पावसाळ्यात मराठवाड्यातील साडेपाच हजार किमी रस्ते गेले वाहून; यंदाही ५०९ किमीची चाळण

By विकास राऊत | Updated: July 27, 2022 20:12 IST

बांधकाम विभागाची ५५० कोटी रुपयांची मागणी होती. मात्र त्यातून अर्धेच अनुदान पदरी पडल्याने बहुतांश कामे रखडली.

- विकास राऊतऔरंगाबाद : गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील सुमारे साडेपाच हजार किमी रस्ते वाहून गेले आहेत. यंदाही ५०९ कि.मी. रस्ते वाहून गेले आहेत.

रस्ते विकासासाठी शासनाने १० हजार कोटींच्या पॅकेजमधून काही रक्कम रस्ते बांधणीसाठी मराठवाडा विभागात दिली होेती. बांधकाम विभागाची ५५० कोटी रुपयांची मागणी होती. मात्र त्यातून अर्धेच अनुदान पदरी पडल्याने बहुतांश कामे रखडली. आता पुन्हा यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांची चाळणी होण्यास सुरुवात झाली असून, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक रस्ते वाहून गेले आहेत. उर्वरित जिल्ह्यातील आढावा बांधकाम विभाग घेत आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची जमीन वाहून जात आहे. साठवलेला शेतमाल, जनावरांचे गोठे, बी-बियाणे शेतात असलेल्या घरातील जीवनावश्यक वस्तू महापुरात वाहून गेल्या आहेत. खरिपातील पावणेचार लाख हेक्टरवरील उभे पीक अतिवृष्टीने आडवे केले. शेतकऱ्यांच्या या नुकसानासोबतच दळणवळणासाठी असलेले रस्तेही वाहून गेले. त्या रस्त्यांची डागडुजी करणे, काही नवीन पक्के रस्ते तयार केल्यास शेतमालाला मार्केटपर्यंत नेणे सोपे होईल. भाजीपाला, फळे, दूध हा माल वेळेत बाजारपेठेपर्यंत जाणे आवश्यक असते. त्यासाठी चांगले रस्ते असणे गरजेचे आहे. याचा विचार करूनच शासनाने मराठवाड्यातील रस्ते बांधणीसाठी अनुदान देण्याची मागणी आगामी काळात होण्याची शक्यता आहे.

रस्त्यांचे नुकसान होत आहेदरम्यान, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता डी. डी. उकिर्डे यांनी सांगितले. मागील पावसाळ्यात विभागातील साडेपाच ते सहा हजार किमी. रस्त्यावर अतिवृष्टीमुळे खड्डे पडले होते. काही ठिकाणचे रस्ते वाहून गेले होते. आवश्यक कामे हाती घेतली आहेत. नांदेड जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्यांत रस्ते, पुलांचे व सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. आगामी काळात दुरुस्ती हाती घेण्यात येईल.

विभागीय प्रशासनाचा अहवाल असाजून व जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील रस्ते, पुलासह शाळा इमारतीसह अन्य अशा ३ हजाराहून अधिक सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. त्या दुरुस्तीसाठी सुमारे ४३३ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या प्राथमिक अहवालात नोंदविण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील ५०९ किमी रस्त्यांचे नुकसान झाले. त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे ३१८ कोटी ६६ लाखांचा निधी अपेक्षित आहे, तर जिल्ह्यातील ४६० पुलांना या पुराचा फटका बसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून त्याच्या दुरुस्तीसाठी ७८ कोटी ३७ लाखांचा निधी लागणार आहे.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाroad safetyरस्ते सुरक्षा