शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

गणपती विसर्जनावेळी सेल्फीच्या नादात तरुण पडला नदीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 12:33 IST

रात्री बारा वाजेच्या सुमारास विसर्जन सुरू असताना मंडळाचा सदस्य अदिल शेख याचा सेल्फी घेण्याच्या नादात पुलावरून अचानक तोल गेला.

कायगाव : गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात विसर्जनासाठी आलेला गणेशभक्त तोल जाऊन पडला. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून जीवन रक्षक पथकातील स्वयंसेवकांनी त्या युवकास सुखरूप बाहेर काढले. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा खंडोबा येथील अष्टविनायक गणेश मंडळाचे सदस्य गुरुवारी रात्री जुने कायगाव येथे गणेश विसर्जनासाठी आले होते. त्यात रात्री बारा वाजेच्या सुमारास विसर्जन सुरू असताना मंडळाचा सदस्य अदिल शेख याचा सेल्फी घेण्याच्या नादात पुलावरून अचानक तोल गेला. त्यामुळे तो सरळ नदी पात्रातील मुख्य धारेत पडला. जवळपासच्या सगळ्या गणेशभक्तांनी आरडाओरड सुरू केली. 

पोलिस निरीक्षक मुकुंद आघाव यांनी तात्काळ पात्रातील तैनात असलेल्या जीवनरक्षक दलाच्या सदस्यांना ध्वनिक्षेपक आणि मोबाईल वरून याबाबत सूचना केल्या. माहिती मिळताच रामेश्वर मंदिराच्या घाटानजीकच्या बोट मधील तैनात असणाऱ्या जीवरक्षक पथकाचे सदस्य दशरथ बिरुटे, महेश खिरे, अक्षय बिरुटे, अमोल बिरुटे, गणेश अहिरे व तहसिलचे कर्मचारी  विजय वाढे यांना सोबत घेऊन गंगापूर नगरपालिकेची बोट तात्काळ घटनास्थळी पोहोचली. बोटीतील जीवनरक्षक पथकाच्या सदस्यांनी पात्रात उड्या मारून त्या युवकास वाचवले. त्यास सुखरूप बोटीत बसवून आरोग्य विभागाच्या हजर असणाऱ्या पथकाच्या ताब्यात देऊन त्याची तपासणी करण्यात आली.

युवक पाण्यात पडल्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्या युवकास पाण्याबाहेर काढण्यात आल्याने त्याचे प्राण वाचले. पोलिसांची समयसूचकता आणि स्थानिक युवकांचे कौशल्य याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस प्रशासन आणि जीवनरक्षक पथकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याने सर्वानी सुटकेचा निःश्वास सोडला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGanesh Mahotsavगणेशोत्सव