जाकिर खान मोहम्मद खान (४८, मकसुद कॉलनी,रोशन गेट) हे परिवारासह लग्नकार्यासाठी उस्मानाबाद येथे गेले होते. तेथील समारंभ आटोपून ते एसटी बसने येत असताना सरंगकोटी फाटा ते सिडको बस स्थानकादरम्यान त्यांची पर्स चोरट्याने लंपास केली. या पर्समध्ये रोख अडीच हजार रुपये, ३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे टॉप्स जोड, चांदीचे पैंजण, चांदीची चैन आणि सोन्याचा हार असा ३८ हजारांचा ऐवज चोरीला गेला. हा प्रकार लक्षात आल्यावर जाकीर यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पोलीस हवालदार शेजूळ हे करत आहेत.
बस प्रवासात प्रवाशाची दागिन्याची पर्स पळविली
By | Updated: November 28, 2020 04:00 IST