शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत आढळले कोरोनाचे डमी रुग्ण; १० हजारात रुपयात ठरला सौदा, पॉझिटिव्ह रुग्ण फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 19:39 IST

Corona dummy patient found in Aurangabad: औरंगाबादेत महापालिकेच्या कोविड रुग्णालयात दाखल पॉझिटीव्ह नसलेले दोन रुग्ण  पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद : स्पर्धा परीक्षेत डमी परीक्षार्थी सापडल्याचे तुम्ही ऐकवीत असाल, मात्र आता कोरोनाचे डमी रुग्ण कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल केले जात असल्याची खळबळजन माहिती उघडकीस आली आहे. महापालिकेच्या चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कोविड रुग्णालयात पॉझीटीव्ह म्हणून दाखल झालेले दोन रुग्ण बोगस असल्याचे (Corona dummy patient found in Aurangabad) आज तपासात उघडकीस आले. या प्रकरणी महापालिकेने तातडीने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दोन दलाल, बोगस रुग्ण आणि पॉझिटिव्ह आलेल्या दोन अशा सहा जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. 

मेल्ट्रॉन रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. वैशाली मुदगडकर यांनी सोमवारी रोजी रात्री उशीराने तक्रार दिली. तक्रारीत म्हटले आहे की, सिद्धार्थ उद्यानासमोर शनिवारी सकाळी उस्मानपुरा येथील गगन पगारे व म्हाडा कॉलनी येथील गौरव काथार यांनी कोरोनाची ॲटीजन टेस्ट केली. दोघे पॉझिटिव्ह निघाले. त्यांनी आपल्या ऐवजी जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी येथील अलोक राठोड व अतुल सदावर्ते यांना मेल्ट्रॉन रुग्णालयात दाखल केले. हे दोघेही बी.एससी.चे शिक्षण घेत आहेत. त्यांना सिडको एमआयडीसी परिसरातच राहणारे विजय मापारी, साबळे यांनी शनिवारी दुपारी साडेतीन वाजता मेल्ट्रॉनमध्ये आणले. मेल्ट्रॉनमधील कर्मचारी शंकर सुरासे यांनी दोघांना भरती करून घेतले. मात्र, आपण कोविड रुग्णालयात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या नावाने भरती झाल्याचे कळताच त्यांची भंबेरी उडाली. त्यांनी डिस्चार्ज करण्यासाठी तगादा लावला. त्यांनी अधिकच तगादा लावल्याने मेल्ट्रॉनच्या डॉ. वैशाली मुदगडकर यांना शंका आली. त्यांनी अधिक विचारणा केली असता त्यांनी एजंट मापारी आणि साबळे यांनी १० दिवसांनी १० हजार रुपये देण्याचे आमिष देऊन भरती केल्याचे सांगितले. 

डमी रुग्ण ताब्यात, मूळ पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध सुरु महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दोन ओरिजनल पॉझीटीव्ह रूग्णांचा शोध घेण्यात येत असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी पारस मंडलेचा यांनी सांगितले. या प्रकरणी दोन्ही डमी रुग्ण पोलिसांच्या ताब्यात असून एजंट मापारी व साबळे आणि मूळ पॉझीटीव्ह रुग्ण गगन पगारे व गौरव काथार यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती तपास अधिकारी शिवाजी चौरे यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी