शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सर्रास पाणी उपशामुळे तलाव पडले कोरडेठाक

By admin | Updated: May 16, 2016 23:33 IST

पाटोदा : तहसील आणि सिंचन प्रशासनाने तलावांतील पाणी वेळीच राखून ठेवले नाही. शिवाय पाणीचोरी पूर्ण क्षमतेने न रोखल्याने तलाव कोरडे पडले आहेत.

पाटोदा : तहसील आणि सिंचन प्रशासनाने तलावांतील पाणी वेळीच राखून ठेवले नाही. शिवाय पाणीचोरी पूर्ण क्षमतेने न रोखल्याने तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे शहर पाणीपुरवठ्यासाठी टँकर लावण्याची वेळ नगरपंचायतीवर आली. पाणीसाठे राखून ठेवण्याबाबत लोकांनी मागणी करूनही दखल न घेतल्याने शासनाचा लाखो रूपये खर्च पाण्यात जात आहे. पाटोदा न. पं. अंतर्गत गांधनवाडी, गीतेवाडी, बांगरवाडी, मंगेवाडी, बामदळेवाडी यासह शहरातील शिवाजीनगर, माऊलीनगर, क्रांतीनगर, जयसिंगनगर या ठिकाणी टँकर लावण्यात आले आहेत. शिवाजीनगर, माऊलीनगरसाठी स्वतंत्र नळयोजना आहे. या योजनेसाठीचा उद्भव बांगरवाडा तलाव आहे. हा तलाव कोरडाठाक पडला आहे. बामदळेवाडी, मंगेवाडी नळयोजनेसाठी मुंगेवाडी तलाव उद्भव आहे. हा तलावही कोरडाठाक पडला आहे. गांधनवाडी व पाटोदा शहरासाठी महासांगवी प्रकल्प उद्भव आहे. हे तिन्ही उद्भव कोरडे पडेपर्यंत पाणीउपसा सुरू होता. गतवर्षी उपरोक्त तिनही तलाव ५०टक्क्यांपर्यंत भरले होते. पूर्ण क्षमतेने तलाव न भरल्यास पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचे शासन आदेश आहेत. महासांगवी तलावातील गाळ काढलेला असल्याने साठवण क्षमता वाढलेली आहे. नागरिकांनी भविष्यातील टंचाई लक्षात घेऊन पाणी राखून ठेवण्याबाबत प्रशासनाकडे मागणी केली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. याउलट पाणी उचलण्यासाठी परवानगी दिली गेली. शेतकऱ्यांनीही भरमसाठ उपसा केल्याने तलाव कोरडेठाक पडले.आजघडीला शहराच्या पाणीपुरवठयावर प्रतिदिन ५० हजार रूपयांपेक्षा जास्तीचा खर्च होतो आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पाणी राखून ठेवण्याबाबत कळवले होते. प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती तर तलाव कोरडे पडले नसते. याऊपरही आम्ही शहराला पाणी कमी पडू देणार नाहीत. नियोजन केले आहे, असे नगराध्यक्षा मनीषा पोटे म्हणाल्या. (वार्ताहर)