शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

जुन्या वादातून मध्यरात्री टोळके घरात घुसले, तरुणास बेदम मारहाण

By राम शिनगारे | Updated: March 21, 2023 18:33 IST

सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल : घरातील मौल्यवान वस्तू हडप

छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादातुन २५ ते ३० जणांच्या टोळक्याने एकाच्या घरात घुसून बेदम मारहाण केली. ही घटना १९ मार्च रोजी मध्यरात्रीनंतर १२.४५ वाजता लोटाकारंजा परिसरात घडली. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात २० मार्च रोजी दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

मुसा खान युसूफ खान (रा. सैय्यद फंक्शन हॉलजवळ, लोटाकारंजा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते १९ मार्चच्या रात्री कुटुंबातील सदस्यासह झाेपलेले होते. तेव्हा इद्रिस वाहेद बाशवान, जुबेर बाशवान, सोहेल बाशवान, नासेर बाशवान, बाशीद बाशवान, शहाब अमर बाशवान, वाजेद अमर बाशवान, युसूफ अमर बाशवान, गजाफी फैसल बाशवान (सर्व रा.लोटाकारंजा) यांच्यासह २५ ते ३० जणांचे टोळके मध्यरात्रीनंतर १.४५ वाजता त्यांच्या घरासमोर आले. घराच्या समोर लावलेल्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच घरावरही दगडफेक केली. त्यात घराच्याही काचा फुटल्या. त्यानंतर बळजबरीने मुसा खान यांच्या घरात टोळके शिरले. आत शिरल्यानंतर फिर्यादीच्या पत्नी, भावजयीसह इतरांना काठ्या, दगडांनी मारहाण केली. त्यानंतर घरातील महिलांचे ४८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. तपास उपनिरीक्षक सुभाष हिवराळे करीत आहेत.

युवकास बेदम मारहाणलोटाकारंजा येथेच याच टोळक्याने मुख्तार शेख हुसैन (रा. नूर कॉलनी) यांच्या मुलास सोहेल बाशवान, नासेर बाशवान, इद्रीश बाशवान, बाशीद बाशवान, युसूफ बाशवान, वाजेद बाशवान, शहाब बाशवान यांनी १९ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता बेदम मारहाण केली. या आरोपींच्या विरोधात २० मार्च रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. तपास उपनिरीक्षक निवृत्ती गायके करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद