शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

सोशल मीडियावरील अपप्रचारामुळे भाजप पदाधिकाऱ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 15:34 IST

भाजप सरकारच्या राजवटीत सर्वसामान्यांचा भ्रमनिरास झाला, महागाईने अनेक विक्रम मोडले, हेच का अच्छे दिन? यासारख्या सोशल मीडियावरील अनेक विडंबनात्मक पोस्ट आणि चावडीवरील अपप्रचारामुळे भाजप पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

- विजय सरवदे 

औरंगाबाद : भाजप सरकारच्या राजवटीत सर्वसामान्यांचा भ्रमनिरास झाला, महागाईने अनेक विक्रम मोडले, हेच का अच्छे दिन? यासारख्या सोशल मीडियावरील अनेक विडंबनात्मक पोस्ट आणि चावडीवरील अपप्रचारामुळे भाजप पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे आता स्वस्थ बसू नका. लोकांमध्ये जाऊन वेगवेगळ्या सरकारी योजनांचा प्रचार करा. लाभार्थ्यांमध्ये जाऊन, तुम्हाला जे काही मिळाले आहे, ते भाजप सरकारमुळेच, अशी त्यांना आठवण करून द्या, या व अशा वेगवेगळ्या टिप्स भाजपच्या नेत्यांनी काल ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पक्षाच्या सर्वच आघाड्यांच्या सदस्य-पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सन २०१४ ची लोकसभा- विधानसभेची निवडणूक असेल किंवा त्यानंतर येणाऱ्या गावपातळीवरील साऱ्याच निवडणुकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपने विजयाचे सर्व विक्रम मोडले आहेत. अलीकडच्या काळात मात्र, त्याच सोशल मीडियाने भाजप नेत्यांची झोप मोडली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काल गुरुवारी जिल्ह्यातील सर्व भाजपचे जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भाजपच्या जिल्हा, तालुका, शहर कार्यकारिणी तसेच व सर्वच आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित झाली.

या बैठकीत भाजपचा अपप्रचार रोखण्यासाठी सज्ज व्हा, असे सांगून योजनांनिहाय याद्या हस्तगत करा. गाव व तालुकानिहाय लाभार्थ्यांच्या याद्या तयार करा, ग्रामसभांमध्ये त्याचे वाचन करा, लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घ्या आणि त्यांना जाणीव करून द्या की, जे काही तुम्हाला मिळाले आहे, ते भाजप सरकारमुळेच.

काही सदस्यांनी कामे होत नसल्याचा सूर आळवला. तेव्हा आपल्याला काय मिळाले किंवा नाही, याचा विचार न करता बुथनिहाय संपर्क अभियान यशस्वी करा. भाजपचा अपप्रचार रोखण्यावर नेटाने भर द्या. आगामी निवडणुकीत बहुमताने भाजपचे सरकार सत्तेत आले, तर तुमची कामे होतील, अशा कानपिचक्याही या बैठकीत दिल्या.

बैठकीत करण्यात आलेले उपदेश असे...भाजपच्या राजवटीत शेतकरी देशोधडीला लागला, असा अपप्रचार केला जात आहे. त्यासाठी पीकविमा, पीककर्ज, बोंडअळीमुळे देण्यात आलेली नुकसानभरपाई आदींच्या याद्या हस्तगत करा. गावनिहाय लाभार्थ्यांच्या याद्या तयार करा. त्यानंतर गावांमध्ये दवंडी लावून ग्रामसभा बोलवा. लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावांच्या यादीचे जाहीरपणे वाचन करा. केंद्र तसेच राज्यात भाजप सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात तुम्हाला हा लाभ मिळाल्याचे त्यांना ठासून सांगा. याशिवाय, संजय गांधी निराधार योजना, मोफत गॅस, मुद्रा लोन, शेततळे, नालाबंडिंग, चर खोदणी, विविध घरकुल योजना, अपंगांच्या विविध योजना, अशा विविध योजनांच्या लाभार्थ्यांना भेटा. त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करा. भाजप सरकारमुळेच तुम्हाला लाभ मिळू शकला, हे त्यांना समजावून सांगा.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाBJPभाजपाElectionनिवडणूकGovernmentसरकार