शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सदोष बँक खाते क्रमांकामुळे दुष्काळी अनुदान मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 23:53 IST

शासनाच्या वतीने दुष्काळी अनुदानाचे वाटप सुरु करण्यात आले आहे. मात्र, महसूल विभागाकडून यादी पाठविताना अनेक शेतकऱ्यांचे सदोष बँक खाते क्रमांक पाठविण्यात आले आहेत.

वाळूज महानगर : शासनाच्या वतीने दुष्काळी अनुदानाचे वाटप सुरु करण्यात आले आहे. मात्र, महसूल विभागाकडून यादी पाठविताना अनेक शेतकऱ्यांचे सदोष बँक खाते क्रमांक पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे बँकेकडून शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यास नकार दिलाजात आहे.परिणामी वाळूज परिसरातील शेकडो शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित आहे.

वाळूज येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत दुष्काळी अनुदान मंजुर झालेल्या वाळूज, शेंदूरवादा, नारायणपूर, लांझी, पिंपरखेडा आदी भागातील शेतकºयांची यादी लावली आहे. संबधित सज्जाच्या तलाठ्याने बँकेकडे याद्या पाठविल्यानंतर या यादीतील शेतकरी बँकेत अनुदानाची रक्कम काढण्यासाठी गर्दी करीत आहेत. मात्र, बँक अधिकाºयांकडून या शेतकºयांना यादीमध्ये तुमचा बँक खाते क्रमांक चुकीचा भरण्यात आल्याने अनुदान मिळणार नसल्याचे सांगत महसूल विभागाकडून नव्याने खाते क्रमांकाची माहिती भरण्यास सांगितली जात आहे.

शेतकºयांना संबधित तलाठ्याकडून सदोष बँक खाते क्रमांक बदलून आणण्याच्या सूचना बँकेच्या अधिकाºयाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी बँकेचे पासबुक घेऊन यादीत नव्याने खाते क्रमांक समाविष्ट करण्यासाठी लगतच्या तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र कन्नडचे उपविभागीय अधिकारी व त्यांच्या वाहनचालकावर खोटा गुन्हा नोंद केल्याचा आरोप करुन महसूल विभागाचे कर्मचारी आठवडाभरापासून संपावर केले आहेत. या संपामुळे तलाठी कार्यालयात हजर राहत नसल्यामुळे सदोष असलेल्या बँक खात्याची दूरुस्ती करण्यासाठी शेतकºयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता पावसाळा तोंडावर आला असून, जमिनीच्या आंतर मशागतीची कामे वेगात सुरु आहेत. खरीप हंगामात बि-बियाणे व खत खरेदी करण्यासाठी दुष्काळी अनुदानाचे पैसे कामी येणार असल्यामुळे शेतकरी अनुदानाचे पैसे केव्हा मिळताच याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

३०० शेतकºयांचे बँक खाते क्रमांक चुकलेविशेष म्हणजे तलाठी कार्यालयाकडून दुष्काळी अनुदान मंजुर झालेल्या शेतकºयांची यादी जिल्हा मध्यवर्ती बँकेत पाठविण्यात आलेली आहे. या यादीत जवळपास ३०० शेतकºयांचे बँक खाते क्रमांक चुकीचे नमूद केल्यामुळे या शेतकºयांना अद्यापपर्यंत अनुदान मिळालेले नाही. या शेतकºयांनी तलाठी कार्यालयातून सदोष नमूद केलेले बँक खाते क्रमांक बदलून आणल्यास त्यांना अनुदान दिले जाणार असल्याचे बँकेचे अधिकारी अनिल रिठे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्र