शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यातील मूग, उडीद उत्पादन घटले; मक्याचा उत्पादनावरही झाला परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 18:40 IST

पावसाने मोेठी दडी मारल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

औरंगाबाद : पावसाने मोेठी दडी मारल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, जिल्ह्यात मूग व उडदाच्या उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. तसेच जिल्ह्यात मक्याच्या उत्पादनावरही ५० टक्के, तर २० टक्क्यांनी कपाशीचे उत्पादन घटण्याचा प्रथम पूर्वानुमान अहवाल कृषी विभागाने जाहीर केला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ३५ हजार ५८५ हेक्टर आहे. त्यापैकी १२,८६५ हेक्टर, तर उडदाची ५,२४४ हेक्टरवर पेरणी झाली. ऐन शेंगा लागणे व भरण्याच्या अवस्थेत असताना जुलै व आॅगस्टमध्ये ३ ते ४ आठवड्यांचा पावसात खंड पडल्याने दोन्हीची उत्पादकता ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घटली आहे. यंदा १ हजार ५१ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली होती. उत्पादनात ८ ते १० टक्के घट होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

गेल्या पाच वर्षांत ज्वारीचे सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ९७८ किलोग्रॅम एवढी आहे, तर यंदा ९२६ किलोग्रॅम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. खरिपात २ लाख ६ हजार ९९४ हेक्टरवर मका लावण्यात आला. त्यापैकी २२,५६३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कणसाची वाढ खुंटली, तसेच दाणे कमी प्रमाणात भरल्याने ४० टक्के उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हेक्टरी २७ किलोने कापसाचे उत्पादन कमी जिल्ह्यात  ३ लाख ८८ हजार ७७८ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. बोंडअळीचा परिणामही जाणवत आहे. २३ हजार ५९९ हेक्टर क्षेत्र हे पावसाच्या खंडाने बाधित झाले आहे. मागील पाच वर्षांत सरासरी उत्पादन (रुई) हेक्टरी २२७ किलो एवढे झाले आहे. यंदा हेक्टरी २०० किलो होण्याचा प्रथम नजर अंदाज नोंदविण्यात आला आहे. 

रबीच्या क्षेत्रात वाढीचे नियोजन औरंगाबाद जिल्ह्यात रबीचे सरासरी क्षेत्र १ लाख ८९ हेक्टर आहे. त्यापैकी मागील रबी हंगामात १ लाख ६९ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदात २ लाख १५ हजार हेक्टरवर पेरणी होेईल, असे नियोजन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. २७ टक्क्यांनी रबीचे क्षेत्र वाढेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादagricultureशेती