शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

हलक्या प्रतीच्या कागदामुळे ५०० रुपयांच्या फाटक्या नोटा वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 16:06 IST

हलक्या प्रतीच्या कागदामुळे दोन वर्षांत खराब झाल्या नोटा

ठळक मुद्देपरवानाधारक व्यापारी कमिशनवर बदलून देताहेत नोटा

औरंगाबाद : नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने चलनात ५०० रुपयांची नोट आणली. मात्र, हलक्या कागदामुळे अवघ्या ३ वर्षांत या नोटा खराब होऊ लागल्या आहेत. हाताळून हाताळून या नोटा फाटू लागल्या आहेत. अशा फाटक्या नोटा घेऊन नागरिक बँकांमध्ये येत आहेत. आठवड्याला १०० पेक्षा अधिक ग्राहक अशा नोटा घेऊन बँकांमध्ये येत आहेत. अति फाटलेल्या नोटा ज्या बँका घेत नाहीत, अशा नोटा परवानाधारक व्यापारी कमिशनवर बदलून देत आहेत. 

८ नोव्हेंबर २०१६ रोजी १,००० रुपये व ५०० रुपयांच्या जुन्या नोटा व्यवहारातून बाद झाल्या. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने नवीन ५०० रुपये व २ हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. ५०० रुपयांच्या नोटेचा आकार ६६ एमएम बाय १५० एमएम एवढा ठेवण्यात आला आहे. मात्र, ५०० रुपयांच्या नवीन नोटा हातात पडताच त्यावेळी नागरिकांनी या नोटा हलक्या प्रतीच्या कागदापासून तयार करण्यात आल्या असल्याचा आरोप केला होता, तसेच हाताळून हाताळून या नोटा लवकर खराब होतील, असेही म्हटले होते. 

नवीन नोटा चलनात येऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. नागरिकांचे म्हणणे आता सत्य ठरत आहे. कारण, बँकांकडे मोठ्या संख्येने ५०० रुपयांच्या नवीन खराब नोटा ग्राहक आणून देत आहेत. शहरात सर्व बँकांमध्ये मिळून दररोज १०० पेक्षा अधिक ग्राहक ५०० रुपयांच्या फाटक्या नोटा आणून देत असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यात २ तुकडे असलेल्या नोटा, हाताळून खराब झालेल्या नोटा, रंग फिक्कट झालेल्या नोटा, एवढेच नव्हे, तर ३ ते ४ तुकडे झालेल्या नोटांचे प्रमाण अधिक आहे. 

स्टेट बँक आॅफ इंडियाच्या दूध डेअरी करन्सी चेस्टमध्ये दर शुक्रवारी अशा नोटा बदलून दिल्या जात आहेत. याच बँकेच्या शाहगंज येथील करन्सी चेस्टमध्ये दररोज ५०० रुपयांच्या १३ ते १५ खराब नोटा घेऊन ग्राहक येत असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. बँक दोन तुकडे असलेली नोट स्वीकारते; पण ती नोट चिकटवून दिलेली पाहिजे. तीन तुकडे असलेली किंवा नंबरवरच खराब झालेली किंवा नंबरवरच तुकडा पडलेली नोट बँक स्वीकारत नाही, असेही त्यांनी नमूद केले. मागील ६ महिन्यांत ५०० रुपयांच्या फाटलेल्या नोटा ग्राहकांकडून आणून देण्याचे प्रमाण वाढल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

तीन तुकड्यांवरील नोटा कमिशन एजन्टकडे तीन तुकड्यांवरील नोटा बँका स्वीकारत नाहीत. अशा नोटा अखेरीस ग्राहक शहरातील कमिशन एजन्टकडे नेत आहेत. कमिशन एजन्टने सांगितले की, दररोज ५०० रुपयांच्या २० ते २५ नोटा ग्राहक आणत आहेत. या नोटा ३० टक्के कमिशन घेऊन बदलून दिल्या जात आहेत. येथून या फाटक्या नोटा मुंबईत रिझर्व्ह बँकेसमोर बसलेल्या कमिशन एजन्टकडे पाठविल्या जातात. ते कमिशन एजन्ट रिझर्व्ह बँकेत नोटा जमा करीत असल्याचे कमिशन एजन्टने सांगितले. 

५ लाखांच्या बनावट नोटा बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बाजारात ३ लाख रुपयांच्या बनावट नोटा चलनात आहेत, तर २ लाख रुपयांच्या बनावट नोटा बँकांमध्ये जमा झालेल्या आहेत. यामुळे बँकांमधील अधिकाऱ्यांनी नोटा स्वीकारताना संपूर्ण काळजी घ्यावी, असेही सूचना देण्यात आल्या आहेत. बँकांमध्ये येणाऱ्या बंडलमध्येही दोन ते तीन बनावट नोटा येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. व्यापारी व ग्राहकांनीही दैनंदिन व्यवहारामध्ये नोटा तपासून घ्याव्यात, असे आवाहनही बँक अधिकाऱ्यांनी केले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMONEYपैसाbusinessव्यवसाय