लोहारा : शहराला टॅकरव्दारे पाणीपुरवठा करण्यासाठी तालुक्यातील बेलवाडी येथील अधिग्रहण केलेल्या बोअरचे पाणी शेतकऱ्यांनी आठ महिन्यापासून पैसे मिळाले नाहीत म्हणून दोन दिवसापासून पाणी देणे बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहेत. ऐन नगरपंचायत निवडणुकीत अशी परिस्थिती ओढावल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.लोहारा शहरात तीव्र पाणीटंचाई असताना शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बेलवाडी येथील पाच बोअर अधिग्रहण करुन सात टँॅकरव्दारे पाणीपुरवठा केला जातो. बेलवाडी येथील पाच बोअर अधिग्रहण करण्यात आले आहे. या अधिग्रहणाचे २५ जुलैपासून प्रत्येकी ९६ हजार रुपये प्रमाणे एकूण ४ लाख ८० हजार रुपये अद्याप पर्यंत दिले गेले नाहीत. असे असतानाच आणखी दोन बोअर १२ जानेवारी पासून अधिग्रहण केले. त्याचे ही पैसे दिले गेले नाहीत. त्यामुळे या सात ही शेतकऱ्यांनी सोमवारपासून टँकरला पाणी देणे बंद केले आहे. एक तर शहरात अनेक दिवसापासून प्रत्येक गल्लीत १३ ते १५ दिवसाला पाणीपुरवठा केला जातो. त्यात सोमवार पासून शहरात टँकरव्दारे होणारा पाणीपुरवठा बंद झाल्याने शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. (वार्ताहर)
पैैसे न मिळाल्याने पाणीपुरवठा बंद
By admin | Updated: April 6, 2016 00:54 IST