शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरातज्ज्ञ हजर नसल्याने मनपाची खंडपीठात फजिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 19:33 IST

जनावरांची हाडे व डायपरचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात होते, मेडिकल वेस्टची विल्हेवाट कशी लावतात, न्यायमूर्तींनी विचारलेल्या या प्रश्नांची उत्तरे देताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बोबडीच वळली.

ठळक मुद्देऔरंगाबाद खंडपीठात मंगळवारी शहरातील कचऱ्याच्या विषयावरील जनहित याचिकेवरील सुनावणी सुरू असताना मनपाचे घनकचरा प्रकल्पप्रमुख व या विषयावरील तज्ज्ञ हजर नसल्याने ही फजिती झाली. जे अधिकारी आले त्यांना उत्तरे देता आली नाहीत. यामुळे न्यायाधीशांनी मनपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. 

औरंगाबाद : जनावरांची हाडे व डायपरचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात होते, मेडिकल वेस्टची विल्हेवाट कशी लावतात, न्यायमूर्तींनी विचारलेल्या या प्रश्नांची उत्तरे देताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बोबडीच वळली.

औरंगाबाद खंडपीठात मंगळवारी शहरातील कचऱ्याच्या विषयावरील जनहित याचिकेवरील सुनावणी सुरू असताना मनपाचे घनकचरा प्रकल्पप्रमुख व या विषयावरील तज्ज्ञ हजर नसल्याने ही फजिती झाली. जे अधिकारी आले त्यांना उत्तरे देता आली नाहीत. यामुळे न्यायाधीशांनी मनपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. 

 न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांंच्या खंडपीठासमोर दुपारी अडीच वाजता जनहित याचिकेवर सुनावणी सुरू झाली. आज राज्य शासन व मनपाच्या वतीने दोन शपथपत्रे न्यायालयासमोर दाखल करण्यात आले. मागील सुनावणीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शपथपत्र दाखल केले होते. त्यात महानगरपालिका शहरात जागोजागी अशास्त्रीय पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावत असल्याचे सांगितले होते. आज मनपाच्या वतीने त्यावर शपथपत्र दाखल केले. त्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा खोटा ठरविण्यात आला व शहरात शास्त्रीय पद्धतीने कचरा साठविला जात आहे, याची माहिती अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी दिली. यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांनी फोटोही सादर केले.

मनपा अधिकाऱ्यांना न्यायाधीशांनी विचारले की, जनावरांची हाडे व डायपरचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात होते, याचे उत्तर देताना त्या अधिकाऱ्यांची बोबडीच वळली. मेडिकल वेस्टची विल्हेवाट कशी लावता, या प्रश्नालाही अधिकारी गोंधळून गेला.राज्य शासनाच्या वतीने अ‍ॅड. अमरजितसिंग गिरासे यांनी शपथपत्र दाखल केले. यात म्हटले आहे की, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश देण्यात आले की, ७५ टक्के ओला-कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात यावे. असे आदेश राज्य शासनाने डिसेंबर २०१७ रोजी दिले आहेत. अंमलबजावणी होते की नाही, यावर राज्य शासन लक्ष देत आहे.

औरंगाबाद मनपाला कचरा शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी राज्य शासनाने पंचसूत्री दिली आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाची गंभीर दखल घेऊन राज्य शासनाने ७ एप्रिल रोजी मनपाला नोटीस बजावली असून, त्यात न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करणे व शास्त्रीय पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणे, तसेच केलेल्या कामाचा अहवाल शासनाला पाठविण्याचे निर्देश दिले असल्याचे वकिलांनी सांगितले. केंद्र शासनातर्फे अ‍ॅड. संजीव देशपांडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने अ‍ॅड. उत्तम बोदर, मूळ याचिकाकर्ता राहुल कुलकर्णीच्या वतीने अ‍ॅड. देवदत्त पालोदकर, अन्य याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. व्ही.डी. सपकाळ, अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर, अ‍ॅड. चंद्रकांत थोरात यांनी काम पाहिले. 

कोर्टाने नाराजी व्यक्त करताच मनपाची आज बैठकमनपाच्या वतीने सांगण्यात आले की, ६ एप्रिल रोजी झालेल्या बैैठकीत चिकलठाणासह शहरात किंवा शहरालगतच्या अन्य तीन ठिकाणी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प करण्याचा, तसेच त्या जागा कोणत्या, याविषयी पुढील बैठकीत निर्णय घेणार आहे. यावर न्यायाधीशांनी विचारले की, मनपा कधी बैैठक घेणार? यावर येत्या दोन ते तीन दिवसांत मनपाची बैैठक होईल, असे सांगण्यात आले. एकीकडे कचरा प्रश्न पेटलेला असताना दुसरीकडे मनपा निर्णय घेण्यास दिरंगाई करीत असल्याने न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी लगेच आयुक्तांशी फोनवर चर्चा करून ११ एप्रिल रोजी बैठक घेऊन त्यात तीन ठिकाणच्या जागा निश्चित करण्याचे न्यायालयाला सांगितले.

मनपावर प्रशासकासंदर्भातील याचिकेवर उद्या सुनावणी शहरातील कचरा प्रश्न व नागरी मूलभूत समस्या सोडविण्यास अपयशी ठरलेल्या महानगरपालिकेवर प्रशासक नेमण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर गुरुवारी १२ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद