शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

वंचित आघाडीमुळे मनपात युतीच्या सत्तेलाही धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 23:16 IST

बहुजन वंचित आघाडी-एमआयएमच्या लोकसभानिवडणुकीतशहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतून २ लाख ६२ हजार मते मिळाली आहेत. या मतांच्या बळावर महापालिकेत मागील ३४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजप युतीला सत्तेपासून ‘वंचित’करण्याची संधी आघाडीला चालून आली आहे. वर्षभरानंतर महापालिकेच्या होणाऱ्यासार्वत्रिक निवडणुकांमध्येयामुळेयुतीच्यासत्तेलाधोकानिर्माणझालाआहे.

ठळक मुद्देमिशन-२०२० : ६५ ते ७० नगरसेवक निवडून येण्याची शक्यता

औरंगाबाद : बहुजन वंचित आघाडी-एमआयएमच्या लोकसभानिवडणुकीतशहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतून २ लाख ६२ हजार मते मिळाली आहेत. या मतांच्या बळावर महापालिकेत मागील ३४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजप युतीला सत्तेपासून ‘वंचित’करण्याची संधी आघाडीला चालून आली आहे. वर्षभरानंतर महापालिकेच्या होणाऱ्यासार्वत्रिक निवडणुकांमध्येयामुळेयुतीच्यासत्तेलाधोकानिर्माणझालाआहे.महापालिकेत शिवसेना-भाजप युतीला कधीच बहुमत मिळाले नाही. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकांमध्ये युतीने अपक्षांच्या मदतीनेसत्ता स्थापन केली . २०१५ मध्ये युतीचे ११३ पैकी फक्त ५१ उमेदवार निवडून आले. सातारा, देवळाईचा समावेश मनपात झाल्यानंतर भाजप, काँग्रेसला प्रत्येकी १ जागा मिळाली. युतीपाठोपाठ सर्वात मोठा पक्ष म्हणून महापालिकेत एमआयएमचा उदय झाला. पक्षाच्या चिन्हावर २४ नगरसेवक निवडून आले. नंतर काहींची हकालपट्टी पक्षातून करण्यात आली. बुढीलेन वॉर्डाच्या पोटनिवडणुकीत एमआयएमची जागा राष्टÑवादी काँग्रेसने हिसकावून घेतली. आजही एमआयएमचे संख्याबळ २३ आहे. महापालिकेत काँग्रेसचे ११ नगरसेवक निवडून आले होते. राष्टÑवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ५ आहे. दोन्ही पक्षात सहा मुस्लिम नगरसेवकांचा समावेश आहे.२२ दलित नगरसेवक२०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप, काँग्रेस, राष्टÑवादी, बीएसपी, रिपाइं डेमोक्रॅटिक, अपक्ष, अशा विविधपक्ष़ाच्या२२ दलितउमेदवारांनी विजय मिळविला. एमआयएमचे २३, काँग्रेस- राष्टÑवादीमधील ६ मुस्लिम नगरसेवकांची बेरीज केल्यास २९ जण होतात. त्यात २२ दलित नगरसेवकांचा समावेश केला तर संख्या ५१ पर्यंत जाते. शिवसेना-भाजप युतीएवढीच ताकद दलित, मुस्लिम नगरसेवकांची आहे.मिशन ७० ठेवणारएमआयएम-बहुजन वंचित आघाडी आगामी मनपा निवडणुकीत युतीला सत्तेपासून रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. कारण एमआयएमला मनपात घवघवीत यश मिळवून देणारे माजी जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी पुन्हा एकदा स्वगृही पोहोचले आहेत. शहरात ७० उमेदवार निवडून आणण्यासाठी जावेद कुरैशी व्यूहरचना आखणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. कारण मध्य विधानसभा मतदारसंघात जावेद कुरैशी ‘वंचित’चे संभाव्य उमेदवार राहण्याची शक्यता आहे. विधानसभेत यश मिळाल्यावर वंचित आघाडी मिशन मनपा राबविणार आहे.युती विरोधात मतदारांमध्ये नाराजीमनपात मागील ३४ वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. मागील साडेतीन दशकांमध्ये युतीने काय केले, असा प्रश्न नागरिक विचारत आहे. नऊ दिवसांनंतर पाणी, शहरात कचºयाचे डोंगर, जिकडे तिकडे खड्डे, मूलभूत सोयी- सुविधांची ओरड सुरू आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये युतीला पाणी, कचरा प्रश्नाचे बरेच चटके सहन करावे लागले.पक्षीय बलाबलशिवसेना - २८भाजप - २३एमआयएम - २३काँग्रेस - १२बीएसपी - ०५राष्टÑवादी काँग्रेस- ०५रिपाइं(डेमोक्रॅटिक)- ०२अपक्ष - १७एकूण - ११५

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPoliticsराजकारण