शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या झळाने मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 19:42 IST

 मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे विभागात केवळ २५ टक्के जलसाठातीन आराखड्यांनुसार प्रशासन करणार काम

औरंगाबाद :  मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऊसतोड कामगारांनी तर मराठवाड्यातून स्थलांतर केलेच आहे. बीड, जालन्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, पैठण तालुक्यांतून ऊसतोडीसाठी स्थलांतर झाल्याची माहिती समोर येत आहे. 

पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी डिसेंबर ते मार्चपर्यंत आणि तेथून पुढे जूनपर्यंत नियोजन करणे. रोजगार उपलब्धतेचा आराखडा केला जात आहे. गावनिहाय, गटनिहाय, मंडळनिहाय चारा उपलब्धतेची माहिती संकलित करणे. या तीन टप्प्यांत प्रशासन काम करीत आहे. तसेच रोजगार हमी योजनेवर किती नागरिक काम करीत आहेत. किती नागरिकांना शेतावर व मनरेगासाठी काम देऊ शकतो. याचीही माहिती प्रशासन संकलित करीत आहे.

पाणी उपलब्ध आहे तोपर्यंत स्थलांतर होणार नाही. मात्र त्यानंतर स्थलांतर होऊ शकते. विभागात सर्व जलसाठ्यांत २५ टक्के साठा आहे. महसूल, ग्रामविकास, कृषी विभागाला दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. चाराटंचाईची परिस्थिती परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत कमी आहे. १३ लाख मेट्रिक टन चाऱ्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. चाऱ्यासाठी पशुधनासह स्थलांतर होण्याची जास्त शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या वाढली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कामांंची संख्या आगामी काळात वाढू शकते. पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड परिसरातील रोहयोच्या कामांवर मजुरांचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीत ३ हजार १६९ मजूर ५९० कामांवर काम करीत आहेत. आठ महिने या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. रोजगारासाठी सर्वाधिक स्थलांतर होण्याची शक्यता आहे. 

विभागीय आयुक्तांची माहिती अशी...स्थलांतर किती प्रमाणात होत आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. किंबहुना त्याबाबत प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडून अहवालदेखील मागविलेले नाहीत. नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी विभागीय प्रशासन तीन टप्प्यांतील आराखड्यानुसार काम करणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी स्पष्ट केले आहे. दुष्काळामुळे मराठवाड्यात भीषण टंचाईग्रस्त परिस्थिती आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना देखील सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आयुक्तांनी दिला.  

टॅग्स :Marathwadaमराठवाडाdroughtदुष्काळMigrationस्थलांतरण