शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सततच्या नापिकीने धीर सुटला, शेतकरी दाम्पत्याने एकाचवेळी जीवनप्रवास संपवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 12:24 IST

Farmer Couple Suicide in Aurangabad : सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथे पत्नीने विहिरीत, तर पतीने झाडाला घेतला गळफास

पिंपळदरी (औरंगाबाद ) : सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरीतील शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.३) सकाळी घडली. पत्नीने विहिरीत उडी घेऊन, तर पतीने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली ( farmer couple commits suicide). सदानंद गुलाबराव गव्हाणे (वय ३९), ज्योती सदानंद गव्हाणे (३२) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. सततच्या नापिकीला कंटाळून या दाम्पत्याने एवढे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा गावात असून आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याला दोन मुलं आहेत.

पिंपळदरीतील ३२ वर्षीय ज्योती गव्हाणे यांनी शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आपल्या राहत्या घराशेजारील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. या घटनेनंतर काही मिनिटांतच ज्योती यांचा पती सदानंद गव्हाणे यांनी आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतला. परिसरातील नागरिकांनी सदानंद यांना खाली उतरवून उपचारासाठी सिल्लोडला नेले; परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत केले.या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, उपनिरीक्षक कैलास पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल अक्रम पठाण, भागीनाथ शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून ज्योती गव्हाणे यांना काढून पती सदानंद गव्हाणेसह शवविच्छेदनासाठी अजिंठा ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या घटनेची अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पोलीस तपास करीत आहे. सततच्या नापिकीला कंटाळूनच गव्हाणे दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा गावात सुरू आहे. आत्महत्या करणाऱ्या या दाम्पत्यास १३ वर्षीय सदानंद आणि १० वर्षीय वैष्णवी नावाची मुलगी आहे.

अल्पभूधारक शेतकरीसदानंद गव्हाणे हे अल्पभूधारक शेतकरी होते. गेल्या काही वर्षांपासून शेतीमधून अपेक्षित उत्पन्न हाती येत नसल्याने ते हैराण होेते. परिणामी डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत असल्याने नापिकीला कंटाळून या दाम्पत्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची माहिती पुढे येत आहे. अजिंठा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा पिंपळदरीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAurangabadऔरंगाबादagricultureशेती