शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
4
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
5
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

सिडकोचा हक्क संपुष्टात ; मालमत्ताधारकांची मालकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 10:43 PM

शहरातील सिडकोने विकसित केलेल्या वसाहती ९९ वर्षांच्या भाडेकरारावरून मालकी हक्कावर करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जाहीर केले.

ठळक मुद्देलीजहोल्डचे झाले फ्रीहोल्ड; मालमत्ताधारकांची मालकी लागणार

चुनावी जुमला : निर्णय झाल्यामुळे भाजपचा जल्लोष, प्रशासकीय पातळीवर अद्याप काही सूचना नाहीऔरंगाबाद : शहरातील सिडकोने विकसित केलेल्या वसाहती ९९ वर्षांच्या भाडेकरारावरून मालकी हक्कावर करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जाहीर केले.लीजहोल्ड टू फ्रीहोल्ड करण्याचा हा निर्णय असून, १ मार्च २००६ पासून याबाबत नागरिकांची मागणी होती. सर्वच राजकीय पक्षांनी या मागणीसाठी शासनाचे उंबरठे झिजविले. एक तपाच्या लढ्यानंतर सिडकोवासीयांना भाडेकराराच्या मालमत्तेचा मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.दरम्यान याप्रकरणी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल, असे बोलले गेले. हा ‘चुनावी जुमला’ असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षांकडून आल्या आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र या निर्णयाचे जोरदार स्वागत करून सिडको कार्यालयावर जल्लोष करीत पेढे वाटले. शिवसेनेनेदेखील सिडको परिसरात जल्लोष करून १० वर्षांपासून मागणी लावून धरल्याचे सांगितले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णयाचे स्वागत केले; परंतु हा ‘चुनावी जुमला’ असल्याचेही त्यांनी नमूद केले.३० आॅक्टोबर १९७२ साली नवीन औरंगाबाद शहराच्या विकासाकरिता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती करण्यात आली. सुमारे १ हजार १२ हेक्टर क्षेत्रफळावर शहरात वसाहत, इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती सिडकोने केली आहे.परवडणारी घरे मिळवून देण्याच्या शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करताना सिडकोने अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटांकरिता २१,०१२ घरकुले बांधली. सर्व सुविधांची निर्मिती करून सिडकोने १ एप्रिल २००६ रोजी मालमत्ता व परिसर महानगरपालिकेकडे १५ कोटींसह सुपूर्द केला.शहरात सिडकोची संपदासिडकोची शहरात २१ हजार १२ घरकुलेआर्थिकदृष्ट्या दुर्बल १३ हजार ९२९ घरे बांधलीअल्प उत्पन्न गटासाठी ५ हजार १४२ घरे बांधलीमध्यम उत्पन्नासाठी १६०० घरे बांधलीउच्च उत्पन्न गटासाठी ४५० घरे बांधली१३ योजनांमध्ये ९ हजार भूखंड विक्रीसर्व मिळून सिडकोच्या सुमारे ३२ हजार मालमत्तावाळूजमध्ये अल्प मध्यम उत्पन्न गटासाठी ९३५ घरेत्याच परिसरात २५०० भूखंडांची विक्रीवाळूज महानगर १ ते ८ प्रकल्पांपैकी ३ कार्यरतसिडको प्रशासकांचे मत असे-सिडको प्रशासक पंजाबराव चव्हाण यांनी सांगितले, निर्णय झाल्याचे लोकप्रतिनिधींकडून समजले आहे. सिडको मुख्यालयाकडून अद्याप काहीही सूचना किंवा माहिती मिळालेली नाही. शासनस्तरावर कशा पद्धतीने निर्णय झाला आहे, हे कळल्यानंतर लीजहोल्डचे फ्रीहोल्डमध्ये हक्क मिळाल्याचे काय फायदे होतील, हे सांगणे शक्य होईल.फ्रीहोल्डमुळे काय लाभ होणारसिडकोने १९७२ पासून आजवर ९९ वर्षांच्या करारानुसार विकलेले घरकुल, भूखंड हे खरेदी करणाºयांचे असेल.सध्या मालमत्ता सिडकोच्या नावे असून, त्याबाबत भाडेकरार आहे. आता जमीन आणि बांधकामाची संपूर्ण मालकी ही मालमत्ताधारकांची होणार आहे.मालमत्ता हस्तांतरण, ट्रान्सफर आॅर्डर, एनओसी या सिडकोच्या त्रासदायक व्यापातून नागरिकांची सुटका होणारसिडकोला भरावा लागणारा सेवाकर देणे बंद होणार. फक्त महानगरपालिकेचा मालमत्ताकर लागणार.भाडेकराराचे विशिष्ट कालावधीत होणारे नूतनीकरण यापुढे करण्याची गरज नसेल.सिडकोऐवजी मालमत्ताधारक स्वत:मालक होणार असल्याने त्यांना पीआर कार्ड मिळणे शक्य.

टॅग्स :cidco aurangabadसिडको औरंगाबादState Governmentराज्य सरकार