शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठ्याला शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:46 PM

औरंगाबाद : मान्सूनपूर्व पावसाने शहराची दाणादाण उडाली असून, वीजपुरवठा करणाऱ्या तारांवर झाडांच्या फांद्या व काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे ...

ठळक मुद्देसिडको-हडकोत ठणठणाट : वीज तारांवर झाडे व फांद्या तुटून पडल्या

औरंगाबाद : मान्सूनपूर्व पावसाने शहराची दाणादाण उडाली असून, वीजपुरवठा करणाऱ्या तारांवर झाडांच्या फांद्या व काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे सिडको-हडकोसह शहरातील बहुतांश वसाहतींत पाण्याचा ठणठणाट झाला आहे.सोमवारी दुपारी एन-५ जलकुंभ परिसरात झाड कोसळल्याने जलवाहिनीला गळती लागली. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला. दोन दिवस जायकवाडी येथील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे आठ ते दहा तास उशिराने पाणीपुरवठा झाला, तर चार दिवसांपासून वादळी वारे आणि पावसामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो आहे.सोमवारी एन-५, एन-७, मरीमाता हर्सूल या जलकुंभांवरून पाणीपुरवठ्यात अडचणी आल्या. एन-५ जलकुंभ परिसरात झाड पडल्यामुळे पाणीपुरवठा बंद करावा लागला.शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे पाणी वितरणास अडचणी येत आहेत. वीजपुरवठा सुरू होताच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा मनपाने केला.महिलांचे जलकुंभ परिसरात आंदोलनसहा दिवस उलटूनही टँकरने पाणीपुरवठा न झाल्यामुळे जयभवानीनगर गल्ली नंबर १२ मधील महिलांनी सोमवारी दुपारी सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेतली.त्यांनी टँकरचालकाचा शोध घेतला. तो दिसताच त्याला टँकरमध्ये बसविले आणि ते टँकर जयभवानीनगर गल्ली नं. १२ मध्ये घेऊन गेल्या. जयभवानीनगर व परिसरात दोन दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा केला जातो. गेल्या आठवड्यात गल्ली नंबर ११ मध्ये एका नऊ वर्षांच्या मुलीचा टँकरखाली येऊन मृत्यू झाला. तेव्हापासून गल्ली नंबर १२ मध्ये टँकरच आले नाही. त्यामुळे सोमवारी दुपारी महिला पाण्याच्या टाकीवर आंदोलनासाठी गेल्या.एन-५ येथे टँकरचा घोळ सुरूचएन-५ येथे टँकर भरणा केंद्रावरील घोळ सुरूच आहे. एका वसाहतीचे नाव सांगून टँकर नेले जाते, परंतु ते टँकर दुसरीकडेच रिते केले जाते. चिकलठाणा परिसरातील हिनानगर येथील महिलांनी सोमवारी टँकर न आल्यामुळे एन-५ येथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. महिलांचा रौद्रावतार पाहताच तेथे असलेले टँकर पाठविण्याचा शब्द देण्यात आला. मात्र, टँकर हिनानगरमध्ये गेलेच नाही. त्यामुळे महिलांनी पुन्हा जलकुंभ गाठून कर्मचाºयांना शिवीगाळ केली. त्यानंतर हिनानगरमध्ये टँकर पाठविण्यात आले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater transportजलवाहतूक