शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
2
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
3
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
4
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
5
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
6
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
7
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
8
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
9
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
10
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
11
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
12
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
13
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
14
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
15
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
17
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
18
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
19
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
20
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाचा मोठा निर्णय; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सलग तीन दिवस 'ड्राय डे'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 19:54 IST

तस्करी रोखण्यासाठी विशेष पथके तैनात, लक्ष ठेवण्यासाठी नऊ अधिकारी, २५ अंमलदारांचे तीन पथक गस्तीवर राहणार

छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरात सलग तीन दिवस 'ड्राय डे' घोषित केला आहे. १४, १५ आणि १६ जानेवारी या कालावधीत महानगरपालिका हद्दीतील सर्व वाईन शॉप, बिअर बार आणि देशी दारूची दुकाने पूर्णपणे बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त १५ जानेवारी रोजी होणारे मतदान आणि १६ जानेवारीचा निकाल, या दोन संवेदनशील दिवसांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दंगा काबू पथक आणि एसआरपीएफच्या तुकड्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. १३ जानेवारी रोजी प्रचार थंडावणार असून त्यानंतरच्या काळात होणारे 'लक्ष्मीदर्शन' आणि मद्याचे वाटप रोखणे, हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

तस्करांवर उत्पादन शुल्क विभागाचा 'वॉच' शहरात बंदी असली तरी ग्रामीण भागातील दुकानांमधून मद्याची तस्करी होण्याची दाट शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अभिनव बालुरे यांनी तीन विशेष भरारी पथके तैनात केली आहेत. यामध्ये पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि अंमलदारांचा समावेश असून, शहरातील ढाबे आणि हॉटेल्सवरही त्यांची नजर असणार आहे. "नुकतीच गोव्यातील अवैध दारू जप्त करण्यात आली असून, अशा प्रकारे अवैध विक्री करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल केले जातील," असा इशारा बालुरे यांनी दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar: Three-Day 'Dry Day' Declared for Municipal Elections

Web Summary : To ensure law and order during Chhatrapati Sambhajinagar's municipal elections, authorities have declared a three-day 'dry day'. All liquor shops will be closed January 14-16. Police presence is heightened, and excise is monitoring illegal liquor sales. Strict action is promised against offenders.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६