शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Drought In Marathwada : साडेतीन हजार गावे जलयुक्त तरी मराठवाड्यात दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 20:26 IST

मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने २०१४-१५ या वर्षापासून जलयुक्त शिवार अभियान ही योजना आखली.

ठळक मुद्देचार वर्षांत २ हजार कोटींचा खर्च योजनेवर१ लाख ५९ हजार ५९९ कामे पूर्ण केल्याचा प्रशासनाचा दावा

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने २०१४-१५ या वर्षापासून जलयुक्त शिवार अभियान ही योजना आखली. चार वर्षांत सुमारे २ हजार कोटी रुपयांचा खर्च योजनेवर करण्यात आला, तरीही मराठवाड्यातील दुष्काळ काही केल्या हटेना. मात्र, या अभियानांतर्गत ३ हजार ७९२ गावे जलयुक्त झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे.

सरकारने डिसेंबर २०१४ मध्ये जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. आजवर योजनेवर सुमारे २ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. असे असताना मराठवाडा दुष्काळाच्या दावणीला बांधला गेला असून २ हजार कोटींचे पाणी कुठे मुरले, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येतो आहे. २०१५-१६ मध्ये विभागात १६८२ गावे निवडली. त्यावर्षी १ हजार ७८ कोटी रुपयांतून १६७६ गावांत कामे पूर्ण केल्याचा दावा होतो आहे. २०१६-१७ मध्ये गावांची संख्या कमी केली. त्यावर्षी १५१८ गावांमध्ये ७८५ कोटी रुपये खर्च केला. आजवर १४८९ गावांत कामे केली.

२०१७-१८ या वर्षात अनेक गावांना वगळण्यात आले. यावर्षी निवडलेल्या १२४८ पैकी ६२८ गावांमध्ये कामे पूर्ण केली आहेत. यासाठी १५८ कोटी रुपये खर्च झाला. अभियानात गावे निवडल्यानंतर गावाच्या पाण्याच्या गरजेचे मोजमाप केले होते. जलयुक्त शिवार अभियनांतर्गत निवडलेल्या प्रत्येक गावात कामे पूर्ण करण्यात आली आहेत, त्यामुळे पाण्याची गरज पूर्ण झाल्यामुळे निवडलेली गावे जलयुक्त आहेत, असा दावा प्रशासनाने केला आहे. 

१ लाख ५९ हजार कामे केली पूर्ण २०१५ ते १८ या कालावधीत १ लाख ५९ हजार ५९९ कामे पूर्ण करण्यात आली. ३५०० गावे जलयुक्त करण्यात आली, असा दावा प्रशासन करीत आहे. राज्य सरकारने गावे जलयुक्त करण्यासाठी केलेला गाजावाजा जनजागृतीसाठी फायदेशीर ठरला खरा; परंतु योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा होऊनही मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे.

जलयुक्त शिवारांतर्गत काय मिळाले वर्ष     पाणीसाठा              विहीर पातळी वाढ२०१५-१६    ३.२३ लक्ष टीएमसी    २.५० मीटर२०१६-१७    ३.१० लक्ष टीएमसी    २.०० मीटर२०१७-१८    १.८५ लक्ष टीएमसी    २.०० मीटरएकूण          ८.१८ लक्ष टीएमसी   २.०० मीटर

टॅग्स :Marathwadaमराठवाडाdroughtदुष्काळWaterपाणीJalyukt Shivarजलयुक्त शिवार