लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : आगारातून धावणाºया लांब व मध्यम पल्ला बसचे भारमान ६० टक्क्यांपेक्षा कमी आल्यास फेºया स्थगित करण्याचे पत्र मध्यवर्ती कार्यालयाने पाठविले आहे. त्यामुळे कंधार आगारात चालक- वाहकांत बस वर्ग होऊन बदली होण्याची धास्ती वाढली असून उत्पन्नवाढीसाठी आता मोठा आटापिटा करावा लागण्याचा प्रसंग बेतला असल्याचे चित्र आहे.लांब व मध्यम पल्ल्याचे भारमान ६० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास फेºया बंद करण्याचे सूचित करण्यात आले आहे. कारण जुलै २०१७ च्या दुसºया दशकातील भारमान कमी आल्याचे निदर्शनास आल्याचे नमूद करण्यात आले आहे. कंधार आगारात पत्र धडकताच चालक-वाहकांत खळबळ उडाली आहे. कंधार आगारात मिडीसह ६३ बसेस आहेत. त्यात लांब पल्ला नागपूर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, आळंदी आणि मध्यमपल्ला रिसोड, लातूर अशा आहेत. लांब व मध्यम पल्ला हा ३८ टक्के किलोमीटर प्रवास आहे आणि उत्पन्न ५७ टक्के असल्याची खात्रीलायक माहिती आहे. उर्वरित प्रवास ६२ टक्के कि.मी. असून उत्पन्न मात्र ४२ ते ४३ टक्के आहे. ग्रामीण व शहरी प्रवासात उत्पन्न आजघडीला अपेक्षित नाही.आगारप्रमुखांनी आरोग्यासाठी कर्मचाºयांना शिबिराचे आयोजन केले. शारीरिक, मानसिक, बौद्धिक तंदुरुस्ती रहावी, यासाठी डॉ. गरुडकर, डॉ. अन्नापुरे, समूपदेशक भोळे, आर.एन. मिर्झा, नर्स आदींनी तपासणी, उपचार केले. उत्पन्न वाढीसाठी आता मोठे प्रयत्न होतील. चालक-वाहक उत्पन्न वाढविण्याची किती हमी घेतात आणि फेºया बंद होणार नाहीत.बस वर्ग होणार नाहीत व बदली होणार नाही, हे आगामी काळात दिसेल. वरिष्ठ पातळीवरुन उत्पन्न वाढीचा जसा तगादा आहे. तसाच वाहतूक शाखेचे २ पर्यवेक्षक, ६ वाहतूक नियंत्रक, ६ लिपिक, आगार लेखाकार-१, वरिष्ठ सहाय्यक-१ ही रिक्त पदे भरावीत. वेळेत साहित्य पुरवठा करावा, असा सूर कर्मचाºयांतून उमटत आहे.
चालक, वाहकांत बदलीची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:23 IST