शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

पावसाळ्यातही झकास पेहराव! रेनकोटने कात टाकली ‘स्पोर्टी लूक’ला अधिक पसंती

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 20, 2024 18:57 IST

यंदा पाऊस जोरदार बरसणार, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

छत्रपती संभाजीनगर : रेनकोट खरेदीसाठी काही चॉइस नसते. प्लेन रंगाच्या रेनकोटची बाजारात गर्दी दिसते. पण आता अशी तक्रार कालबाह्य होत आहे, कारण बाजारात ‘स्पोर्टी लूक’ रेनकोट अवतरले आहेत. यामुळे पावसातही तुमचा पेहराव झकास दिसणार आहे.

यंदा पाऊस जोरदार बरसणार, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळेच जूनआधीच व्यापाऱ्यांनी रेनकोटची पहिली खेप बाजारात विक्रीला आणली. किरकोळ विक्रेत्यांनी आपली दुकाने सजवली आहेत.

४० हजार रेनकोट दाखलशहरात जूनच्या आधीच ४० हजार रेनकोटची पहिली खेप दाखल झाली आहे. त्यांची किंमत १ कोटी ३० लाख ते १ कोटी ६० लाख रुपयांदरम्यान आहे. यातील ३० टक्के रेनकोटची आतापर्यंत विक्री झाली आहे.

स्पोर्टी लूक रेनकोटयंदा आकर्षण आहे ते स्पोर्टी लूक रेनकोटचे. यातही अनेक व्हरायटी व दोन ते तीन रंगांत रेनकोट उपलब्ध आहेत. वॉटरप्रुफ गॅरंटी दिली जात आहे. लिकेज होणार नाही, अशी पेस्टिंग या रेनकोटची केली आहे. पावसाचा अंदाज घेत आणखी तीन खेपा टप्प्याटप्प्याने येतील. ‘स्पोर्टी लूक’मुळे रेनकोटची विक्री चांगली राहील.- संजय डोसी, व्यापारी

स्कूटर कट रेनकोटमहिलांसाठी खास स्कूटर कट रेनकोट विक्रीला आले आहेत. नोकरी करणाऱ्या महिलांच्या हे रेनकोट पसंतीला उतरले आहेत. विविध फुलांचे, विविध रंगांतील हे रेनकोट आहेत. महिलांसाठी बाजारात २०० ते १२०० रुपयांदरम्यान विविध रेनकोट मिळत आहेत.

विद्यार्थ्यांसाठी रेनकोट खरेदीशालेय गणवेशासोबत रेनकोटची खरेदी केली जात आहे. विद्यार्थ्यांसाठीचे रेनकोट जून व जुलै महिन्यातच मिळतात. नंतर व्यापारी मागवत नाहीत.

लॅपटॉपसाठी रेन कव्हरआता लॅपटॉप अनेकांच्या सोबतच असतो. महागडे लॅपटॉप पावसाने खराब होऊ नयेत, यासाठी ‘लॅपटॉप बॅग रेन कव्हर’ बाजारात आले आहे. १२५ ते १५० रुपयांदरम्यान ही कव्हर विकली जात आहेत.

यंदा छत्र्यांचे भाव उतरलेदरवर्षी भाववाढ होत असते. मात्र, यंदा पहिल्यांदाच छत्र्यांचे भाव मागील वर्षीच्या तुलनेत ५ टक्क्यांनी कमी झाले आहेत. याचे कारण, मागील वर्षी ३५ ते ४० टक्के छत्र्या विक्रीविना राहिल्या होत्या. यामुळे ५ टक्के भाव कमी करून त्या विकल्या जात आहेत. बाजारात छत्र्यांची पहिली खेप दाखल झाली असून, ४० ते ६० हजार छत्र्या बाजारात आल्या आहेत. ६० लाख ते ९० लाखदरम्यान त्यांची किंमत आहे. १६० ते ३२० रुपयांदरम्यान छत्र्या मिळत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस