शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

विद्यापीठाची डिजिटल भरारी; लवकरच १० लाख पदव्या होणार ‘डिजी लॉकर’मध्ये जमा

By विजय सरवदे | Updated: May 20, 2023 18:58 IST

आगामी काळात कागदपत्रे सुरक्षित राहतील व ती सोबत बाळगण्याची गरजही राहणार नाही.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी ‘डिजी लॉकर’ची सुविधा देण्याची योजना हाती घेतली आहे. त्यामुळे आता महत्त्वाची कागदपत्रे सोबत बाळगणे किंवा नोकरीसाठी सातासमुद्रापार जरी गेलात, तरी कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन करण्याची चिंता मिटणार आहे. अलीकडच्या दहा वर्षांतील सुमारे दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत दोन लाख १८ हजार विद्यार्थ्यांच्या पदव्या या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात विद्यापीठ सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, केंद्र शासनाच्या उच्च शिक्षण मंत्रालयांतर्गत ‘नॅशलन अकॅडमिक डिपॉझिटरी’ स्थापन करण्यात आली आहे. या अंतर्गत देशातील सर्व विद्यापीठे, स्वायत्त संस्थांमधील विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे, गुणपत्रिका ऑनलाइन उपलब्ध असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी या उपक्रमांतर्गत ‘डिजी लॉकर’ हे पोर्टल सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. त्यानुसार सध्या सन २०१२ ते २०२२ या दहा वर्षांतील पदवीधरांच्या पदव्या ‘डिजी लॉकर’मध्ये अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दहा वर्षांतील सुमारे दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे या लॉकरमध्ये अपलोड करण्याचा निर्धार कुलगुरू डॉ. येवले यांनी केला आहे. आतापर्यंत दोन लाख १८ हजार विद्यार्थ्यांच्या पदव्या अपलोड झाल्या आहेत.

... अन्यथा निकाल रोखले जातीलमहाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेनंतर ‘एमकेसीएल’च्या संकेतस्थळावर माहिती भरताना विद्यार्थ्यांचा अचूक मोबाइल क्रमांक व ईमेलची नोंद करावी. अलीकडे सर्व विद्यार्थ्यांच्या नावापुढे एकच मोबाइल क्रमांक भरलेला दिसत आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्राची माहिती पोर्टलमध्ये अपलोड करता येत नाही. विद्यापीठाचे परीक्षा अर्ज हे संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत विद्यापीठास सादर करण्यात येतात. त्यामुळे ही सर्व जबाबदारी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची आहे. प्राचार्यांनी त्वरित कार्यवाही करून सात दिवसांच्या आत कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा. अन्यथा आपल्या महाविद्यालयाचे निकाल घोषित करण्यात येणार नाहीत, असा इशारा परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिला आहे.

आगामी काळात गुणपत्रिकांचीही सुविधादेश-विदेशात नोकरीस लागलेल्या तरुणांची कागदपत्रे ‘व्हेरिफिकेशन’साठी विद्यापीठाकडे पाठविण्यात येतात. आता ‘डिजी लॉकर’च्या माध्यमातून ‘ऑनलाइन व्हेरिफिकेशन’ सुलभ होऊ शकते. विशेष म्हणजे, आगामी काळात कागदपत्रे सुरक्षित राहतील व ती सोबत बाळगण्याची गरजही राहणार नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी आपली नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन वेळेत डाटा पाठवावा. यापुढे पदवीसोबतच गुणपत्रिका देखील या लॉकरमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणStudentविद्यार्थी