शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Video: विद्यापीठ युवक महोत्सवात प्रहसन बंद पाडले; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

By योगेश पायघन | Updated: October 18, 2022 20:10 IST

विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाच्या संघातील सहा कलावंत ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डाॅट रामायान डाॅट काम’ हे प्रहसन नाट्यगृहात सोमवारी सायंकाळी सादरीकरण करत होते.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवात सादर होणाऱ्या प्रहसनाने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करीत, तो प्रयोग केवळ दीड मिनिटात बंद पाडल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे वाद निर्माण झाला आहे. पटकथा पडताळणी समितीने ती पटकथा तपासलेली नाही का, याची चाैकशी करून दोषींवर कारवाईची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांच्याकडे केली आहे.

विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाच्या संघातील सहा कलावंत ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डाॅट रामायण डाॅट कॉम’ हे प्रहसन नाट्यगृहात सोमवारी सायंकाळी सादरीकरण करत होते. तोच दीड-दोन मिनिटात ते बंद पाडले. १० मिनिटांच्या स्क्रिप्टमधून सामाजिक संदेश द्यायचा होता. तो देता आला नाही. आम्हाला सादरीकरणाची संधी मिळाली पाहिजे. प्रहसनातून विडंबनात्मक मांडणी असते. प्रहसन आणि नाटकातील फरक समजून घ्यायला हवा, असे संघातील कलाकारांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

स्क्रिप्ट तपासल्या जात नाहीत का?अभाविपचे नागेश गलांडे म्हणाले, विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाने सादर केलेल्या प्रहसनात प्रभुराम, सीता, लक्ष्मण या देवीदेवतांचा अवमान केला. त्यामुळे तो प्रयोग बंद पाडला. त्यानंतर, डॉ. संजय संभाळकर यांच्यासमोर नाट्यशास्त्र विभागाच्या संघातील काहींनी माफीही मागितली. मात्र, आमच्या अस्मितेचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. एवढ्यावरच हे थांबणार नाही. या स्क्रिप्ट तपासल्या जात नाहीत का? पडताळणी समितीने हे प्रोत्साहन दिले का? याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी कुलगुरूंकडे केली आहे. 

दहशत खपवून घेणार नाहीरिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम यांनीही कुलगुरूंना दिले. निवेदनात विद्यापीठ शिक्षणाचे केंद्र असून, धर्माच्या नावाखाली दहशत खपवून घेणार नसून, उत्सवात विरजण टाकणाऱ्यांना महोत्सवापासून दूर ठेवा, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर गुणरत्न सोनवणे, कुणाल भालेराव, अ‍ॅड.अतुल कांबळे यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. 

अर्धवट पाहून चुकीचा अर्थ लावलाया प्रहसनाला यापूर्वी अनेक पारितोषिके मिळालेली असल्याने यातील काही भाग काढून ती मांडणी केली होती. ऐनवेळी नवख्या विद्यार्थ्यांनी ओव्हर ॲक्टिंग केली. या प्रहसनातून देव, धर्मांच्या राजकारणापेक्षा जिवंत प्रश्नांवर भांडले पाहिजे, असा संदेश देण्याचा प्रयत्न होता. मात्र, अर्धवट पाहून त्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे, असे करू नका हे सांगणारा तो प्रसंग नाटकातील ‘नाटका’चा आहे. त्यातून कुणाचाही अवमान करण्याचा हेतू नाही. तरी दिग्दर्शक महिला शिक्षिका आणि संघप्रमुख म्हणून मीही माफी मागितली आहे.- डाॅ. अशोक बंडगर, संघप्रमुख, नाट्यशास्त्र विभाग

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र