शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सान्निध्य लाभलेले त्र्यंबकराव डेंगळे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:07 IST

समाजकल्याण विभागाचे माजी सहसंचालक त्र्यंबकराव डेंगळे काळाच्या पडद्याआड

छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेल्या आणि सामाजिक चळवळीच्या विविध टप्प्यांवर कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त समाजकल्याण सहसंचालक त्र्यंबकराव दिगंबरराव डेंगळे (वय ९२, रा. जयसिंगपूरा) यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने एक अनुभवी, निष्ठावान व समर्पित आंबेडकरी कार्यकर्ते हरपले गेले आहेत. त्यांच्यावर बेगमपुरा स्मशानभूमीत शोकमग्न वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

बाबासाहेबांच्या शिक्षणक्रांतीचे साक्षीदारडेंगळे हे मिलिंद महाविद्यालयाच्या दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी होते. त्या काळी महाविद्यालयाचे वर्ग छावणीतील निजाम बंगल्यात भरत असत. नंतर जेव्हा नागसेनवन परिसरात मिलिंद महाविद्यालयाची इमारत उभारली गेली, तेव्हा बाबासाहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली राऊंड होस्टेलची स्थापना केली. त्याच दरम्यान डेंगळे यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले होते.

बाबासाहेबांचा विश्‍वासडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्र्यंबकराव डेंगळे यांच्यावर विश्वास ठेवत राऊंड होस्टेलच्या रेक्टरपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. ही केवळ प्रशासनिक जबाबदारी नव्हे, तर आंबेडकरी विद्यार्थी घडवण्याची सामाजिक जबाबदारी होती. त्यांच्या या कार्यकाळात असंख्य विद्यार्थ्यांना आधार मिळाला.

धर्मांतर सोहळ्यातील सहभाग१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ. आंबेडकर यांच्या उपस्थितीत भव्य धम्मदीक्षा सोहळा पार पडला होता. या ऐतिहासिक प्रसंगी मंचावर सादर करण्यात आलेल्या प्राचार्य म. भि. चिटणीस लिखित ‘युगयात्रा’ या नाटकात डेंगळे यांनी भूमिका साकारली होती. ही गोष्ट त्यांचं बाबासाहेबांच्या सांस्कृतिक व वैचारिक कार्यातले योगदान दर्शवते.

समाजकल्याण विभागातील कार्यबाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर डेंगळे यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यास समर्पित केले. त्यांनी समाजकल्याण विभागात नोकरी स्वीकारली आणि सहसंचालक म्हणून सेवानिवृत्त होईपर्यंत निष्ठेने सेवा केली. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी त्यांनी अनेक उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी विचारसरणीचा एक सजीव दुवा हरपला आहे. त्यांचे कार्य आणि बाबासाहेबांशी असलेले नातं हे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरPeople's Education Societyपीपल्स एज्युकेशन सोसायटीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर