शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

विद्यापीठाची ‘पेट-२’ ऑनलाइनच, परंतु परीक्षा केंद्रांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:58 IST

पहिल्या पेपरमध्ये ६ हजार ७७५ विद्यार्थ्यांन ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट-२) ही ऑनलाइन; परंतु ती आता घरातून न देता विद्यार्थ्यांना केंद्रांवर जाऊन द्यावी लागेल. पेट - १ या परीक्षेस विद्यार्थी घरातून सामोरे गेले होते. यात अनेक गैर प्रकार झाल्याची चर्चा होती. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुद्धा फटका बसल्याचे पुढे आल्याने पेट - २ परीक्षा केंद्रावर घेण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती.

यापूर्वी ‘पेट- २’ ही ऑनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांना घरूनच देता येईल, अशा सूचना ३० डिसेंबर रोजी जारी केल्या होत्या; मात्र आता कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी ही परीक्षा विद्यापीठाने निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीनेच घेतली जाईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर संगणक आणि इंटरनेट सुविधा पुरवण्यात येईल, अशा सुधारित सूचना जारी केल्या आहेत. 

पहिल्या पेपरमध्ये ६ हजार ७७५ विद्यार्थ्यांन ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेस (पेट) ४२ विषयांसाठी ११ हजार ७६८ जणांनी नोंदणी केली होती. यापैकी ११ हजार १५४ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. १ फेब्रुवारीस या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. ११ हजार १५४ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ६८८ जणांनी मराठीत, तर २८४ संशोधकांनी हिंदी भाषेत ही परीक्षा दिली, तर ५ हजार १८२ विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून पेपर दिला. यातील ११६ जणांना शून्य गुण मिळाले, तर ४ हजार २६३ विद्यार्थ्यांना १ ते ४४.५ टक्क्यांदरम्यान गुण प्राप्त झाले. ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६ हजार ७७५ एवढी आहे. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीexamपरीक्षा