शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

विद्यापीठाला मिळणार प्रभारी कुलगुरू? 'टॉप फाईव्ह'मुलाखतीची तारीख नक्की ठरेना

By राम शिनगारे | Updated: December 27, 2023 20:17 IST

सध्या राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या निवडीचा पॅटर्ननुसार टॉप फाईव्हमधील उमेदवारांच्या नावावर खल सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळण्याऐवजी १ जानेवारी रोजी प्रभारी कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे. राज्यपालकांकडे 'टॉप फाईव्ह' उमेदवारांच्या होणाऱ्या मुलाखतीची तारीख नक्की ठरलेली नाही. त्यामुळे येत्या सहा दिवसांत मुलाखती होऊन उमेदवार अंतिम होण्याची शक्यता दुरापास्त बनल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.

विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंसाठी शोध समितीने २९ नोव्हेंबर रोजी आयआयटी मुंबईत २४ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. या मुलाखतींना २२ उमेदवारांनी हजेरी लावली. त्यातील पाच जणांच्या नावाचा लिफाफा शोध समितीने २९ नोव्हेंबर रोजीच राजभवनाकडे सुपूर्द केला होता. त्यात पुणे विद्यापीठातील डॉ. विलास खरात, डॉ. संजय ढोले, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील डॉ. ज्योती जाधव, डॉ. विजय फुलारी आणि नागपूर येथील डॉ. राजेंद्र काकडे यांच्या नावाचा समावेश होता. या 'टॉप फाईव्ह' जणांना राजभवनातुन मेलद्वारे १९ डिसेंबर रोजी मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले होते.

मात्र, या मुलाखतीच्या एक दिवस आधीच संबंधित उमेदवारांना अपरिहार्य कारणास्तव मुलाखती स्थगित केल्या असून, नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे सूचित केले होते. त्यास आता आठवडा उलटला आहे. तरीही नव्याने 'टॉप फाईव्ह'च्या मुलाखतींची तारीख अद्यापपर्यंत मिळालेली नाही. विद्यमान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास अवघे सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे उर्वरित सहा दिवसांमध्ये 'टॉप फाईव्ह' उमेदवारांना मुलाखतींसाठी बोलावून त्यातून एकाची निवड करणे शक्य नसल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. त्यामुळे विद्यापीठास काही कालावधीसाठी प्रभारी कुलगुरू मिळणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट आहे.

उमेदवारांवर सहमती होईना का? सध्या राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या निवडीचा पॅटर्ननुसार टॉप फाईव्हमधील उमेदवारांच्या नावावर खल सुरू आहे. त्यात सत्ताधाऱ्यांच्या विचारसरणीचे बहुतांश उमेदवार नसल्यामुळे मुलाखती लांबणीवर पडत असल्याची चर्चाही उच्चशिक्षण क्षेत्रात सुरू झाली आहे. तसेच कोल्हापूरच्या एका उमेदवारासाठी ओबीसी समाजातील ज्येष्ठ मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद