शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार नऊ जणांना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:21 AM

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मराठवाड्यातील नऊ जणांना राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. राज्यातील एकूण ६१ जणांना आणि सहा संस्थांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. २०१७-१८ साठीचे हे पुरस्कार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मराठवाड्यातील नऊ जणांना राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. राज्यातील एकूण ६१ जणांना आणि सहा संस्थांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. २०१७-१८ साठीचे हे पुरस्कार आहेत.पुरस्कारासाठी प्रतिव्यक्ती १५ हजार आणि प्रतिसंस्था २५ हजार रुपये अशी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद येथील डॉ. ऋषिकेश भीमराव कांबळे, नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील यादव सीताराम तामगाडगे, लातूर येथील केशव गोरोबा कांबळे, धडकनाळ येथील पंडित केरबा सूर्यवंशी, जळकोट येथील माजीद गफूरसाब मोमीन, परभणी येथील भीमराव नागराव हत्तीअंबिरे, हिंगोली येथील साहेबराव कामाजीराव कांबळे, औंढा येथील सूरजितसिंह रामसिंह वाघमारे (ठाकूर) आणि बीड येथील शंकर चन्नापा वीटकर यांचा समावेश आहे. सामाजिक काम करणाºया व्यक्ती, संस्थांना प्रेरणा मिळावी म्हणून १९७१-७२ पासून हा पुरस्कार दिला जातो.

दु:खितांचा कैवार घेताना जे राबता आलं, त्याची दखल राजसत्तेनं घेतली, त्याचं एक विलक्षण समाधान आहे. मी भानावर राहून दीन-दुबळे, ओबीसी, एससी,एसटी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी याशिवाय सवर्णांमधील दुबळ्यांसाठीसुद्धा झटत राहावे, अशी प्रेरणा हा पुरस्कार देईल.-प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, औरंगाबाद
तालुक्यातील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ‘लोकमत’च्या माध्यमातून प्रयत्न केले़ याची शासनाने दखल घेतली, याचा आनंद आहे़-माजीद गफूरसाब मोमीन जळकोट, जि़ लातूर

गेल्या अनेक वर्षांपासून करीत असलेल्या समाजसेवेचे फळ मिळाले, याचा आनंद झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्कारामुळे जीवनाचे सार्थक झाल्याचे वाटत आहे.- साहेबराव कांबळे , हिंगोली
हा सन्मान माझा एकट्याचा नसून, भटक्या विमुक्त चळवळीत काम करणाºया माझ्यासोबतच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे.- शंकर वीटकर, बीड
या पुरस्कारामुळे नव्याने काम करण्याची ऊर्मी मिळाली असून, यापुढेही समाजाच्या शेवटच्या घटकाच्या उत्कर्षासाठी सतत कार्यरत राहणार आहे़-भीमराव हत्तीअंबिरे, परभणी
गेली ३५ वर्षे आंबेडकरी चळवळीत आणि धम्म कार्यात आहे़ शासनाकडून त्याची दखल घेतली गेली याचा मनस्वी आनंद आहे़ हा आंबेडकरी चळवळीचा बहुमान आहे़-केशव गोरोबा कांबळे, लातूर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी आहे. या पुरस्कारामुळे समाजकार्यासाठी नवी ऊर्जा मिळाली आहे.-पंडित केरबा सूर्यवंशी, धडकनाळ, जि. लातूर
शिक्षणाबरोबरच विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत गोडी निर्माण व्हावी यासाठीही प्रयत्न केले. या बरोबरच विविध नाटकांच्या माध्यमातून लोकप्रबोधनाचे काम केले. शासनाने याची दखल घेतल्याचा आनंद आहे.- यादवराव तामगाडगे, किनवट, जि. नांदेड
गेल्या ३0 वर्षांपासून आंबेडकरी विचारधारेसोबतच समाजसेवेचे काम करीत आहे. त्याच विचारधारेमुळे आज मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार मिळाला.-सूरजितसिंह ठाकूर, औंढा, जि. हिंगोली

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरState Governmentराज्य सरकारMarathwadaमराठवाडा