शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंची चौकशी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:23 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळातील कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची अनियमितता, नेमणुकांमधील गोंधळाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना राज्य सरकारने केली होती. विद्यापीठात ही समिती सोमवारी (दि.२१) दाखल झाली. या समितीमुळे प्रशासकीय इमारतीत निरव शांतता होती.

ठळक मुद्देविद्यापीठ : समिती दाखल; बेकायदा नेमणुका, आर्थिक भ्रष्टाचाराचा होणार पर्दाफाश

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळातील कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची अनियमितता, नेमणुकांमधील गोंधळाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना राज्य सरकारने केली होती. विद्यापीठात ही समिती सोमवारी (दि.२१) दाखल झाली. या समितीमुळे प्रशासकीय इमारतीत निरव शांतता होती.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याविरोधात राज्यपाल कार्यालय आणि विधिमंडळात लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीवरून उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी २८ मार्च रोजी उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती. यासाठी माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.परंतु कुलगुरूची चौकशी करण्यासाठीचे पत्र डॉ. पाटील यांना खूप उशिरा मिळाले. राज्य सरकारने डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीत जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी. बी. पाटील आणि नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कथलाकुट्टे हे सदस्य आहेत. ही त्रिसदस्यीय समिती विद्यापीठात सोमवारी (दि.२१) पहिल्यांदाच दाखल झाली. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्या अ‍ॅन्टीचेंबरमध्ये समितीचे सदस्य बसले होते. त्याठिकाणीच त्यांनी चौकशीसाठी लागणाऱ्या सुविधा, कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यानुसार विद्यापीठ प्रशासनाला समितीला सर्व प्रकारची मदत करावी लागणार आहे.आमचेही म्हणणे ऐकून घ्याविद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. भाऊसाहेब राजळे आणि विद्यापरिषद सदस्य डॉ. विलास खंदारे यांनी समिती अध्यक्षांना चौकशीदरम्यान बाजू मांडण्यासाठी वेळ देण्याची विनंती निवेदनाद्वारे केली. मराठवाडा विकास कृती समितीचे डॉ. दिगंबर गंगावणे, अ‍ॅड. शिरीष कांबळे आदींनी हीच मागणी केली.विद्यापीठ देणार तीन अधिकारी व कर्मचारीविद्यापीठ प्रशासन उपकुलसचिव व इतर दोन कर्मचारी समितीच्या मदतीला देणार आहे. तसेच समितीच्या सदस्यांसाठी संगणक, प्रिंटर आदी साहित्यही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. साधना पांडे यांनी दिली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र