शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पाच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मिळाले प्रकुलगुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 20:48 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला अखेर पाच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर प्रकुलगुरू मिळाले आहेत. राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व जलतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांची प्रकुलगुरूपदी निवड केली.

ठळक मुद्देकुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी प्रकुलगुरूपदासाठी डॉ. अशोक तेजनकर, विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सी. जे. हिवरे आणि लातुर येथील दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जोगिंदरसिंग बिसेन यांच्या नावाची शिफारस केली होती.राज्यपालांनी तिघांच्या मुलाखती २७ सप्टेंबर २०१७ रोजी राजभवनात घेतल्या. यानंतर दोन दिवसात नेमणूक होण्याची शक्यता होती. मात्र यासाठी तब्बल २३ फेब्रुवारीचा दिवस उजडला.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला अखेर पाच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर प्रकुलगुरू मिळाले आहेत. राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व जलतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांची प्रकुलगुरूपदी निवड केली. याविषयीचे पत्र शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाले. दरम्यान, डॉ. तेजनकर हे सोमवारी (दि.२६) सकाळी ११ वाजता पदभार घेणार आहेत.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी प्रकुलगुरूपदासाठी डॉ. अशोक तेजनकर, विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सी. जे. हिवरे आणि लातुर येथील दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जोगिंदरसिंग बिसेन यांच्या नावाची शिफारस केली होती. राज्यपालांनी तिघांच्या मुलाखती २७ सप्टेंबर २०१७ रोजी राजभवनात घेतल्या. यानंतर दोन दिवसात नेमणूक होण्याची शक्यता होती. मात्र यासाठी तब्बल २३ फेब्रुवारीचा दिवस उजडला. तब्बल पाच महिन्यांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर विद्यापीठाचे पहिले प्रकुलगुरू म्हणून डॉ. अशोक तेजनकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

प्रशासन, संशोधनाचा दिर्घ अनुभवडॉ. तेजनकर यांना शिक्षण,  प्रशासन, भूगर्भ संशोधन क्षेत्रात २८ वर्षांचा अनुभव आहे. पाण्याच्या क्षेत्रातील विविध संशोधन प्रकल्प, भारत सरकारच्या स्किल इंडिया प्रकल्प, महाराष्ट्र-इस्राईल जलनियोजन समितीवर उल्लेखनीय कार्य केले आहे.  याशिवाय तेजनकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ६२ संशोधन पेपर सादर केले आहेत. त्यांचे ९ ग्रंथ प्रकाशित आहेत. 

‘दानवें’चा शब्द अंतिमशैक्षणिक क्षेत्रातील नियुक्त्यांमध्येही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा शब्द अंतीम ठरत आहे. विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदाची नियुक्ती पाच महिन्यांपासून रखडली होती. यात दानवे यांनी हस्तक्षेप करत डॉ. तेजनकर यांच्या पारड्यात वजन टाकल्यामुळे नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते. यापूर्वी कुलगुरू डॉ. चोपडे यांनी रावसाहेब दानवे यांचे बंधू जालना नगरपालिकेतील नगरसेवक भास्कर दानवे यांची कुलगुरू कोट्यातील अधिसभा सदस्यपदी नेमणूक केली आहे. यामुळे शैक्षणिक वर्तुळातही आता दानवे यांचा शब्द अंतिम ठरू लागल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद